अतुल सावे सक्षम, पालक मंत्रीपद नसले तरी ते विकास करू शकतात: अंबादास दानवे 

अतुल सावे एक सक्षम आमदार, राज्यमंत्री आहेत. त्यामुळे विकासकामे करण्यासाठी त्यांच्याकडे पालकमंत्रीपद असले म्हणजे कामे वेगाने होतील, अन्यथा होणार नाहीत, असे समजण्याचे कारण नाही.-अंबादास दानवे
save-danve
save-danve

औरंगाबादः जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळावी यासाठी राज्यमंत्री अतुल सावे यांच्याकडे पालकमंत्रीपदही सोपवावे अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. यावर शिवसेनेने संयमित भूमिका घेतली आहे.

 "अतुल सावे हे सक्षम मंत्री आहेत, त्यामुळे विकास कामे करण्यासाठी त्यांच्याकडे पालकमंत्रीपदच असायला हवे असे नाही, त्या शिवायही ते विकासकामे करू शकतात. शिवसेना समर्थपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील,"अशा शब्दांत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी भाजपच्या दाव्यातील हवा काढून घेतली. 

राज्यमंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर अतुल सावे यांनाच जिल्ह्याचे पालकमंत्री करा अशी मागणी भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी केली आहे. यासाठी लवकरच आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.

 सरकारनामाशी बोलतांना अंबादास दानवे म्हणाले, "मुळात जिल्ह्यातील कोणतीही विकासकामे रखडलेली नाहीत. पालकमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्ह्यातील सगळ्याच विकासकामांचा वेळोवेळी आढावा घेत असतात.जिल्ह्याची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी तीन बैठका देखील घेतल्या. त्यामुळे विकासकामे रखडली म्हणून पालकमंत्रीपद अतुल सावे यांना द्यावे अशी काही वस्तुस्थिती नाही. "

"अतुल सावे एक सक्षम आमदार, राज्यमंत्री आहेत. त्यामुळे विकासकामे करण्यासाठी त्यांच्याकडे पालकमंत्रीपद असले म्हणजे कामे वेगाने होतील, अन्यथा होणार नाहीत, असे समजण्याचे कारण नाही.शिवाय शिवसेना अतुल सावे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. विकासकामांच्या बाबतीत म्हणाल तर सावे यांना कसलीही अडचण येणार नाही याची खबरदारी आम्ही निश्चितच  घेऊ," असे सांगत अंबादास दानवे यांनी भाजपची पालकमंत्रीपदाची मागणी चुकीची असल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com