amarsinh pandit birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : अमरसिंह पंडित (आमदार) 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 31 मे 2017

आजचा वाढदिवस : अमरसिंह पंडित (आमदार) 

आजचा वाढदिवस : अमरसिंह पंडित (आमदार) 

माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे पुत्र असलेले अमरसिंह हे राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे सदस्य आहेत. पक्षाचे प्रदेश सरचिटणीसपदही त्यांच्याकडे आहे. पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सभापती असा प्रवास केल्यानंतर त्यांनी गेवराई विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढवली. एकदा चुलत काका माजी मंत्री बदामराव पंडित यांनी त्यांचा पराभव केला. तर पुढील निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत अमरसिंह पंडीतांनी बदामरावांचा पराभव करत उट्टे काढले होते. जयभवानी साखर कारखाना, जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ, शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे सहकार, सामाजिक क्षेत्रात काम आहे. तालुक्‍याच्या बाजार समिती, खरेदी विक्री संघावरही त्यांचे वर्चस्व आहे. 
 

संबंधित लेख