amaravti martaha krnati morcha | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी अमरावतीमध्ये भाजपच्या नगरसेविकेचा राजीनामा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

अमरावती : मराठयांना आरक्षण देण्यात यावे, या मागणीच्या समर्थनार्थ अमरावती महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका जयश्री डहाके यांनी राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणावर भाजपच्या लोकप्रतिनिधीने दिलेला हा पहिलाच राजीनामा ठरला आहे. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आतापर्यंत चार आमदारांनी राजीनामे दिले आहेत. काही आमदारांनी राजीनामे देऊ केले आहेत. परंतु भाजपच्या एकाही लोकप्रतिनिधीने राजीनामा दिलेला नाही. परंतु अमरावती महापालिकेतील भाजपच्या नगरसेविकेने राजीनामा देऊन भाजपची अडचण केली आहे. जयश्री डहाके या भाजपच्या प्रभाग क्र. 12 (रुक्‍मिणीनगर) च्या नगरसेविका आहेत.

अमरावती : मराठयांना आरक्षण देण्यात यावे, या मागणीच्या समर्थनार्थ अमरावती महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका जयश्री डहाके यांनी राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणावर भाजपच्या लोकप्रतिनिधीने दिलेला हा पहिलाच राजीनामा ठरला आहे. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आतापर्यंत चार आमदारांनी राजीनामे दिले आहेत. काही आमदारांनी राजीनामे देऊ केले आहेत. परंतु भाजपच्या एकाही लोकप्रतिनिधीने राजीनामा दिलेला नाही. परंतु अमरावती महापालिकेतील भाजपच्या नगरसेविकेने राजीनामा देऊन भाजपची अडचण केली आहे. जयश्री डहाके या भाजपच्या प्रभाग क्र. 12 (रुक्‍मिणीनगर) च्या नगरसेविका आहेत. जयश्री डहाके यांनी भाजपचे गटनेते सुनील काळे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजपची अडचण झालेली असताना जयश्री डहाके यांनी राजीनामा दिल्याने भाजपच्या नेत्यांची चांगलीच अडचण झाली आहे. या संदर्भात बोलताना भाजपचे गटनेते सुनील काळे म्हणाले, जयश्री डहाके यांनी राजीनामा दिला आहे. परंतु या संदर्भातील निर्णय महापौर घेत असतात. त्यामुळे राजीनामा स्वीकारला किंवा नाही, याबद्दल माहिती नाही. मराठा आरक्षणाचा मुद्या महत्त्वाचा आहे. भाजपचे सरकार असूनही कोणताही निर्णय होत नसल्याने राजीनामा दिल्याचे जयश्री डहाके यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख