मुख्यमंत्र्यांचा `पायगुण' जळगावकरांना अंधार देणारा ठरला : सुप्रिया सुळे 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावला आले, वीज बंद करून गेले अन् जळगावकरांच्या वाट्याला भारनियमन देवून गेले. आपण अधंश्रध्दा मानत नाही, परंतु मराठीतून एखाद्याच्या येण्यावर आणि त्याच वेळी काही घडण्यावर `पायगुण' असा शब्द वापरला जातो. जळगावकरांसाठी मुख्यंमत्र्यांचा हा `पायगुण' अंधार देणारा ठरला, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांचा `पायगुण' जळगावकरांना अंधार देणारा ठरला : सुप्रिया सुळे 

अमळनेर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावला आले, वीज बंद करून गेले अन् जळगावकरांच्या वाट्याला भारनियमन देवून गेले. आपण अधंश्रध्दा मानत नाही, परंतु मराठीतून एखाद्याच्या येण्यावर आणि त्याच वेळी काही घडण्यावर `पायगुण' असा शब्द वापरला जातो. जळगावकरांसाठी मुख्यंमत्र्यांचा हा `पायगुण' अंधार देणारा ठरला, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी केली आहे.
 
अमळनेर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, की सरकारच्या कोळशाच्या चुकीच्या धोरणामुळे विजेचे भारनियमन होत आहे. हे सरकार बेजबाबदार आहे. कुठल्याही गोष्टीचे नियोजन नाही. भाजप सरकारने 24 तास वीजपुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, 24 तास वीज मिळते काय ? जळगावमध्ये सकाळी सात ते दहा व सायंकाळी सात ते दहा असे रोज सहा तास भारनियमन होत आहे. या सरकारचे नियोजन नसून, जनता वेठीस धरली जात आहे. शेतकरी बांधव दुष्काळात होरपळले आहेत. मात्र, तरीही शासनाला जाग येत नाही, अशीही टीका खासदार सुळे यांनी यावेळी केली. 

राम कदमांबद्दल मुख्यमंत्र्यांची चुप्पी 
दहीहंडी कार्यक्रमात भाजपचे आमदार राम कदम हे महाराष्ट्रातील मुलींबद्दल असभ्य भाषेचा वापर करतात हे भारतीय संस्कृतीसाठी लांच्छनास्पद आहे. मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असल्याने त्यांनी आमदार कदम यांना चाप द्यायला हवा होता. गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर काही तरी कारवाई होणे अपेक्षित होते. हेच जर "राष्ट्रवादी'च्या एखाद्या आमदाराने केले असते तर त्याला जनतेसमोर नेऊन जाहीर माफी मागायला लावले असते. लोकप्रतिनिधींनी असे बोलणे योग्य नाही आणि यावर गृहमंत्र्यांनी साधलेली चुप्पी याचा आपण निषेध करीत असल्याचेही त्यांनी सांगितले
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com