Amabadas Danve asks tough questions to Kishanchand Tanwani | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

तनवाणीजी केंद्रात- उत्तर प्रदेशात तुमची सत्ता, मग मंदिर बांधायला अडवले कोणी ? अंबादास दानवे 

जगदीश पानसरे 
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे  यांचे  भाजप शहरप्रमुख किशनचंद तनवाणी यांना  प्रत्युत्तर

औरंगाबादः"  विश्‍व हिंदू परिषद असो की भाजप कुणीही मंदिर बांधले तर आम्हाल आनंदच आहे. आम्हीही त्यात सहभागी होऊ. शिवसेनेने कधीही राम मंदीर बांधू असा दावा केलेला नाही. निवडणुकी आधी बहुमत मिळू द्या आम्ही राम मंदिर बांधू हे सांगून भाजप सत्तेवर आली," अशा शब्दात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे  यांनी   भाजप शहरप्रमुख किशनचंद तनवाणी यांना   प्रत्युत्तर दिले. 

" पण चार वर्षात त्यांना राम मंदिराचा विसर पडला. आज केंद्रात आणि उत्तर प्रदेशातही भाजप सरकारला बहुमत आहे, मग तुम्हाला राम मंदिर बांधण्यापासून कुणी रोखले?" असा सवाल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या  अयोध्या दौऱ्यावर टिका करतांना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी 'राम मंदिर फक्त विश्‍व हिंदू परिषद, व हिंदूच बांधू शकतात, शिवसेना राम मंदिर बांधू शकत नाही' असा टोल लगावला होता. 

यावर बोलताना श्री. दानवे म्हणाले ,"विश्‍व हिंदू परिषद राम मंदिराच्या मुद्यावर पंचवीस वर्षापासून काम करते आहे हे कोणीच नाकारू शकत नाही. आयोध्येत त्यांच्याकडून राम मंदिर बांधले जाणार असेल तर त्याचा आम्हाला आनंदच होईल, आमचा त्यांना पाठिंबाच असेल, विरोध असण्याचे कारण नाही."

" पण राम मंदिर बांधू असे सांगून सत्तेवर आलेल्या भाजपला गेल्या चार वर्षात रामाचा विसर पडला होता. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन भाजपला रामाची आठवण करून दिली, आणि त्यामुळेच राम मंदिर निर्माणाच्या कामाला गती मिळू शकते असा दावा अंबादास दानवे यांनी केला. 

मशिद कुणी पाडली  अयोध्येत जाऊन विचारा.. 

" पंचवीस वर्षापुर्वी आयोध्येतील बाबरी मशीद कुणी पाडली हे एका आयोध्येत जाऊन विचारा. विश्‍व हिंदू परिषद, भाजपसह सगळ्याच संघटना पक्षांनी जेव्हा मशीद पाडल्याची जबादारी झटकली होती. तेव्हा, एकमेव हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे असे सांगत जबाबदारी स्वीकारली होती." असेही दानवे म्हणाले .  

" अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान काळात देशात बहुमत येऊ द्या, मग राम मंदिर बांधतो असे सांगितले गेले. याच मुद्यावर निवडणुका लढवल्या गेल्या. पण केंद्रात आणि उत्तर प्रदेशात बहुमत आल्यावरही भाजपने राम मंदिराच्या प्रश्‍नाकडे कानाडोळा केला. याची आठवण करून देण्यासाठीच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा  अयोध्या दौरा होता ,''असेही अंबादास दानवे म्हणाले.

संबंधित लेख