alligation on mla balasaheb murkute | Sarkarnama

नेवासेतील वाळूतस्करांना आमदार मुरकुटेंचा पाठिंबा? 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

नेवासे तालुक्‍यातील वाळुतस्कराची मुजोरगिरी केवळ राजकीय आश्रयामुळे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर होणारे जिवघेणे हल्ले निषेधार्ह आहेत. 
- शंकरराव गडाख, माजी आमदार 

नगरः माजी आमदार शंकरराव गडाख यांनी भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे. वाळुतस्करांनी तहसीलदारांना केलेल्या धक्काबुक्कीच्या निमित्ताने वाळुतस्करांना राजाश्रय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

निंभारी परिसरात वाळुतस्करांवर कारवाई करताना तहसीलदारास धक्काबुक्की झाल्याच्या पार्श्वभूमीवर गडाख यांनी आपले मत व्यक्त केले. नेवासे तालुक्‍यात रात्रंदिवस वाळुतस्करी कोणाच्या आशिर्वादाने होते, हे सर्व जनतेला आता माहिती झाले आहे. गेल्या चार वर्षांत केवळ राजकीय आर्शिवादाने वाळुतस्करी फोफावली आहे. त्यामुळे प्रचंड गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नेवासे तालुक्‍यातील ही स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. वाळुतस्करी पकडल्यास जुजबी कारवाई होते. केवळ राजकीय दबावामुळे पोलिस, प्रशासन योग्य कारवाई करीत नाहीत. त्यातूनच गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून, अशा अपप्रवृत्तीकडे आगामी काळात जनताच पाहून घेईल, असा इशारा गडाख यांनी दिला. 

संबंधित लेख