Alliance with BJP only for Elections Purpose Says Ramdas Athavle | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

आम्ही भाजपबरोबर निवडणुकीपुरते : रामदास आठवले

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 डिसेंबर 2018

भारतीय जनता पक्षासोबत असलेली राजकीय युती फक्त निवडणुकीपुरती असून, भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेशी आमचा संबंध नाही. माझा झेंडा निळा आहे. तो मी कधीही सोडणार नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

कल्याणः भारतीय जनता पक्षासोबत असलेली राजकीय युती फक्त निवडणुकीपुरती असून, भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेशी आमचा संबंध नाही. माझा झेंडा निळा आहे. तो मी कधीही सोडणार नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

कल्याण येथे गंगाधर पानतावणो साहित्यनगरीत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनात बोलताना आठवले म्हणाले, समाजातील प्राध्यापक, साहित्यिक यांच्यासोबत पुणे, नागपूर, मुंबई या ठिकाणी बैठका घेतल्यानंतरच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय माझा एकट्याचा नाही. यापुढेही सर्वांना विचारात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल.'

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याने आठवले यांना मारहाण केली होती. पक्षांतर्गत वाद हे मारहाणीचे कारण नसून, आठवले हे भाजपसोबत गेल्याने त्यांच्या विरोधात समाजामध्ये असंतोषाचे वातावरण आहे, असे वक्तव्य आंबेडकरी विचारवंतांनी केले होते. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी भाजपशी युतीचा खुलासा केला.
 

संबंधित लेख