all communities are against BJP but EVM machines are helping BJP to win | Sarkarnama

सगळे समाज विरोधात; भाजपचा विजय 'ईव्हीएम' यंत्रामुळे  :  फौजीया खान 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मराठा, धनगर, मुस्लीम समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. सगळ्यांचा सरकार विरोधात आक्रोश आहे. अशा स्थितीत जळगाव, सांगलीत भाजप निवडणुकीत कसा जिंकु शकतो?

नाशिक: " मराठा, धनगर, मुस्लीम समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. सगळ्यांचा सरकार विरोधात आक्रोश आहे. अशा स्थितीत जळगाव, सांगलीत भाजप निवडणुकीत कसा जिंकु शकतो? फक्त 'ईव्हीएम' यंत्रातील गोंधळामुळे भाजप निवडून आला. त्यामुळे 'ईव्हीएम' मशीनएैवजी मतदानासाठी मतपत्रिकांचाच वापर करावा , ही देशभरातील विरोधी पक्षांची मागणी आहे," असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान यांनी केले. 

पक्षाच्या महिला आघाडीतर्फे 'संविधान बचाव, देश बचाव' कार्यक्रम लवकरच नाशिकला होणार आहे. त्याच्या तयारीसाठी त्यांनी येथे महिला पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी आमदार विद्या चव्हाण, ऍड प्रेरणा बलकवडे, भारती पवार, जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होत्या. 

श्रीमती खान म्हणाल्या, "महाराष्ट्रात विविध घटक रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत आहेत. मराठा समाजाचे आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन पेटले आहे. धनगर समाज आरक्षणासाठी आंदोलन करीत आहे. मुस्लीम समाजाने आंदोलन सुरु केले आहे. हे सगळे सरकार विरोधात आहेत. असे असतांना सांगली व जळगाव महापालिकेत भाजप कसा जिंकु शकतो याचे आश्‍चर्य वाटते."

"मतदानासाठी मतदानयंत्रांचा वापर करु नये अशी जोरदार मागणी असतांना केवळ भाजप त्याचा आग्रह धरते. अमेरिका, युरोपात मतदानयंत्रांचा वापर सुरु झाला होता. मात्र मतदान करतांना अन्‌ मतमोजणी या दोन्ही वेळा हे यंत्र हॅक करता येते हे सिध्द झाले आहे. त्यामुळे प्रगत देशांनी त्याचा वापर बंद केला आहे. लंडनच्या एका संस्थेने निवडणूक आयोगाला मतदानयंत्र हॅक करता येते हे सिध्द करुन दाखवले आहे. त्यामुळे आम्ही या यंत्रांची होळी करणार आहोत."

संबंधित लेख