अलिबागच्या नायब तहसीलदाराला  लाच घेताना पकडले 

mah-police-
mah-police-

अलिबाग     : उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणारे अलिबागचे नायब तहसीलदार सुभाष माने (वय 56) यांना गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली आहे. माने हे पुढच्या वर्षी निवृत्त होणार होते. 

तक्रारदाराला वैयक्तिक कामासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्‍यकता होती. त्यासाठी त्यांनी अलिबाग तहसीलदार कार्यालयात दोन महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. ही जबाबदारी नायब तहसीलदार सुभाष माने यांच्याकडे होती. तक्रारदाराने त्यांच्याशी संपर्क केला असता दाखल्यावर सही करण्यासाठी त्यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर चार हजार रुपये देण्याचे ठरले. 

त्यानंतर अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात माने यांच्याविरोधात 3 ऑक्‍टोबरला तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीची 4 ऑक्‍टोबरला पडताळणी केल्यानंतर तहसील कार्यालयात आज सापळा रचून लाच घेताना माने यांना पकडण्यात आले. माने यांनी चार महिन्यांपूर्वीच नायब तहसीलदारपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यापूर्वी ते निवडणूक विभागात कार्यरत होते. पुढच्या वर्षी ते निवृत्त होणार होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com