भाजपचे ‘संकल्प पत्र’ म्हणजे लबाडाचे आमंत्रण - डॉ. सुधीर ढोणे

भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या जाहीरनाम्याला ‘संकल्प पत्र’ असे नाव दिले असले तरी ते लबाडा घरचे आमंत्रण असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे.
भाजपचे ‘संकल्प पत्र’ म्हणजे लबाडाचे आमंत्रण - डॉ. सुधीर ढोणे

अकोला : भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या जाहीरनाम्याला ‘संकल्प पत्र’ असे नाव दिले असले तरी ते लबाडा घरचे आमंत्रण असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे. 

अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. ढोणे यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना २०१४ च्या जाहीरनाम्यातील १२५ आश्‍वासने खोटी ठरल्याचा दावा केला आहे. २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पृष्ठभूमीवर भाजपने आपल्या जाहीरनाम्यात ७५ संकल्प जाहीर केले आहेत. हे संकल्प म्हणजे खोटेपणाचा कळस असल्याचा आरोपही त्यांनी केला. पूर्वीच्या आश्‍वासनांचे काय झाले ते स्पष्ट न करता नवीन ७५ आश्वासने दिल्याने जनतेला ही आश्वासने म्हणजे लबाडाचे आमंत्रण वाटत असल्याचा आरोप डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे. 

पत्रकार परिषदेस काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, प्रदेश महासचिव मदन भरगड,  शहर अध्यक्ष माजी आमदार बबनराव चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, मनपाचे विरोधी पक्षनेता साजिदखान पठाण, महिला आघाडीच्या जिल्ह्या अध्यक्षा साधनाताई गावंडे, नगरसेवक मो. जमीर, राजू चितलांगे, अफरोज लोधी, प्रसिध्दी प्रमुख भुषण टाले पाटील, शेख जावेद आदी पदाधिकारी उपस्थित  होते.

या आश्‍वासनांचे काय?

  • भाजपने २०१४ च्या जाहीरनाम्यात प्रतिवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. रोजगार तर मिळाला नाहीच उलट नोटबंदीमुळे ४ कोटी ७० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. 
  • काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३५ ए व ३७० कलम रद्द करण्याचे आश्‍वासन
  • राम मंदिराची  उभारणी व समान नागरी कायदा अमलात आणण्याचे आश्वासन.
  • दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र सर्वोच्च न्यायालयात हे शक्य नसल्याचे शपथपत्र दिले. 
  • विदेशातील ८० लाख करोड काळेधन परत आणण्याचे आश्वासन.
  • पेट्रोल व डिझेल स्वस्त करण्याचे आश्वासन.
  • देशात १०० स्मार्ट सिटी बनविण्याचे आश्वासन.

खरे की खोटे?

  • २०१९ च्या घोषणापत्रात स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन, ८० लाख कोटी विदेशातील काळेधन आणण्याचेही आश्वासन नसल्याने मागील जाहीरनाम्यातील ही आश्वासने म्हणजे केवळ ‘जुमला’च होती हे भाजपनेच कबूल केले आहे का?
  • २०१९ च्या जाहीरनाम्यात पृष्ठ क्रमांक ६ वर भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी अध्यक्षीय पत्रात मुद्रा योजनेअंतर्गत १४ कोटी लोकांना कर्ज दिल्याचे नमूद केले आहे. तर याच जाहीरनाम्याच्या पृष्ठ क्रमांक ३२ वर याच योजनेअंतर्गत १७ कोटी लोकांना कर्ज दिल्याचे नमूद केल्याने भाजपच्या अध्यक्षांचा दावा खोटा ठरविला आहे का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com