akola-sudhir-dhone | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

काँग्रेसच्या प्रशिक्षण समितीत विदर्भातून डॉ. सुधीर ढोणे यांची वर्णी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाने प्रशिक्षण समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये विदर्भातून प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांची वर्णी लागली आहे.

अकोला : राजस्थानचे माजी मुख्यमंत्री व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाने प्रशिक्षण समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये विदर्भातून प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांची वर्णी लागली आहे.
 
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक लक्षात घेता प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यासाठी काँग्रेसने प्रशिक्षण समिती गठित केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच प्रशिक्षण समितीची बैठक मुंबई येथील पक्षाच्या मुख्यालयात  झाली. या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल, प्रशिक्षण समितीचे प्रदेश समन्वयक आमदार रामहरी रुपनवार, आमदार हुस्नाबानो खलिके, डॉ.सुधीर ढोणे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस यशवंत हाप्पे, श्रीमती निला लिमये, हेमलता पाटील, श्रीमती लेखा नायर, जोत्स्ना विसपुते, प्रदेश सचिव अलनासीर झकेरिया आदी पदाधिकारी उपस्थीत होते. यावेळी प्रदेश अध्यक्ष खा.अशोक चव्हाण, सोनल पटेल, रामहरी रुपनवार यांनी राज्यात आयोजित करावयाच्या प्रशिक्षण शिबिराबाबत व प्रशिक्षणातील मुद्यांबाबत मार्गदर्शन केले. 
 

संबंधित लेख