akola-shivsena-volunteers-ayodhya | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

अकोल्यातून एक हजार शिवसैनिक अयोध्येत दाखल

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

"पहिले मंदिर फिर सरकार'चा नारा देत अयोध्यासाठी निघालेल्या जिल्ह्यातील एक हजारावर शिवसैनिकांची लखनौमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लखनौ येथून दुपारी अयोध्येकडे कुच करणार असल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा महापालिकेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी दिली. 

अकोला : "पहिले मंदिर फिर सरकार'चा नारा देत अयोध्यासाठी निघालेल्या जिल्ह्यातील एक हजारावर शिवसैनिकांची लखनौमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लखनौ येथून दुपारी अयोध्येकडे कुच करणार असल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा महापालिकेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी दिली. 

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या श्रीरामाचा जयघोषानंतर संपूर्ण देशाचे लक्ष अयोध्येकडे लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यातील शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. शिवसेनेच्या मिशन अयोध्यामध्ये अकोला जिल्ह्यातून एक हजारावर शिवसैनिक सहभागी झाले आहेत. 

शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया, पश्‍चिम विदर्भ कायदे विभागप्रमुख अनिल काळे, महापालिकेचे गटनेता राजेश मिश्रा, नगरसेवक मंगेश काळे, शशि चोपडे, तरूण बगेरे, संतोष अनासाने, मुकेश मुरूमकार, शरद तुरकर, अशोक गिते यांच्यासह शहरातून 700 च्यावर शिवसैनिक गितांजली रेल्वेने नागपूरमार्गे आज सकाळीच लखनऊ येथे पोहचले. पक्षाने येथील हॉटेलमध्ये शिवसैनिकांची राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र, शिवसैनिकांची संख्या वाढल्याने गटनेता राजेश मिश्रा यांनी स्वखर्चाने शिवसैनिकांची निवास, भोजन आणि प्रवासाची व्यवस्था केली. 

यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शरयू नदीवर होत असलेल्या महाआरतीत सर्व शिवसैनिक सहभागी होणार असल्याचे राजेश मिश्रा यांनी सांगितले.  
 

संबंधित लेख