Akola - Shivsena, NCP agitaiton | Sarkarnama

अकोल्यात शिवसेनेचा गोंधळ, राष्ट्रवादीचा गदारोळ

श्रीकांत पाचकवडे 
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमुळे आज येथील राजकीय वातावण सकाळपासून चांगलेच तापले आहे. सत्ताधारी भाजपने करवाढीचा प्रस्ताव दिल्याने विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे. 

अकोला : अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमुळे आज येथील राजकीय वातावण सकाळपासून चांगलेच तापले आहे. सत्ताधारी भाजपने करवाढीचा प्रस्ताव दिल्याने विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे. 

सर्वसाधारण सभा होण्यापूर्वीच शिवसेनेने आपल्या खास शैलीतील आंदोलनाने अकोलेकरांचे लक्ष वेधले आहे. शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकाऱयांनी महापालिकेसमोरच गोंधळी आंदोलन केले. त्यातून करवाढीचा ठराव रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. त्यामुळे हे आंदोलन चर्चेचा विषय ठरले. 

सर्वसाधारण सभेपुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका उषा विरक यांनी सभाग्रूहात जलकुंभी आणत सभेत गदारोळ केला. पोलिस व सुरक्षा रक्षकांनी जलकुंभी बळजबरीने हिसकून घेतली. त्यामुळे गोंधळ उडाला. 

टॅग्स

संबंधित लेख