Akola Shivsena morcha | Sarkarnama

अकोल्यात शिवसेनेचा घागर मोर्चा 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 मे 2017

मलकापूर परिसरातील हजारो नागरिकांना होणाऱ्या दुषीत पाणीपुरवठ्यावर शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. पाणी प्रश्नावर आक्रमक होत शिवसेना नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी सोमवार (ता.29) महापालिकेवर घागर मोर्चा काढून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. 

अकोलाः मलकापूर परिसरातील हजारो नागरिकांना होणाऱ्या दुषीत पाणीपुरवठ्यावर शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. पाणी प्रश्नावर आक्रमक होत शिवसेना नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी सोमवार (ता.29) महापालिकेवर घागर मोर्चा काढून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. 

अकोला महापालिकेच्या हद्दवाढीत जिल्ह्यात सर्वांत श्रीमंत ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या मलकापूर गावाला समाविष्ठ करण्यात आले आहे. वीस-पंचवीस हजार लोकवस्ती असलेल्या या प्रभागात गत काही महिन्यांपासून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महापालिकेकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा अनियमित आहे. त्यातही दुषीत पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 

नागरिकांच्या या समस्येवर शिवसेना नगरसेवक मंगेश काळे यांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाणीपुरवठा करून ही समस्या सोडविण्याची मागणी केली. मात्र, त्यावर कोणतीच उपाययोजना होत नसल्याने आज नगरसेवक काळे यांच्या नेतृत्वात मलकापूर परिसरातील शेकडो महिला, पुरुषांनी महापालिकेवर घागर मोर्चा काढला. यावेळी मंगेश काळे यांच्यासह अनेक महिलांनी बॉटलमध्ये दुषीत पाणी आणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखविले. मलकापूर परिसराला महान धरणातून पाणीपुरवठा करणे, शुद्ध पाणीपुरवठ्या होण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करणे आदी मागण्यांचे निवेदन काळे यांच्यासह शेकडो महिलांनी आयुक्तांना दिले. नागरिकांच्या या समस्येवर लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन आयुक्त अजय लहाने यांनी दिले.

संबंधित लेख