मुख्यमंत्री फडणवीस सांगतील, त्या मतदारसंघातून लढणार : सदाभाऊ खोत 

आगामी निवडणुकीत सदाभाऊ खोतमाढा लोकसभा मतदारसंघातून लढणार काय? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
sadabhau khot
sadabhau khot

अकोला : मी भाजपच्या कोट्यातूनच आमदार आणि मंत्री झालो आहे. आगामी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावरच लढणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी `सरकारनामा'शी बोलताना दिली. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप प्रणित महायुतीमधून बाहेर पडल्यानंतर गेल्या वर्षभरापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर रयत क्रांती संघटनेची स्थापना करून राज्यात आगामी निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत सदाभाऊ खोत माढा लोकसभा मतदारसंघातून लढणार काय? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. 

कृषी विभागाच्या विभागीय आढावा बैठकीसाठी सदाभाऊ खोत शनिवारी (ता.9) अकोल्यात आले असता त्यांनी आगामी निवडणुकीत भाजपच्याच तिकीटावर लढणार असल्याचे स्पष्ट केले. मला आमदारकी भाजपच्या कोट्यातून मिळाली आहे. कृषी राज्यमंत्री पदही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस सांगतील तर माढा लोकसभा मतदारसंघ किंवा इतर कोणता विधानसभा मतदारसंघातून लढायची माझी तयारी असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. 

सध्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावरून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. रयतक्रांती संघटनेच्या माध्यमातूनही आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहो. केवळ एका मतदारसंघापुरते आमचे लक्ष नसून संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी स्वतः अधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय बैठका घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कृषी राज्यमंत्री खोत यांनी सांगितले. 

युतीच्या प्रश्नावर सदाभाऊ झाले निरुत्तर 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांमध्ये भाजपशी युती न करता स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे केंद्र व राज्यात सत्ताधारी भाजप-शिवसेनेत सध्या तणावाचे वातावरण पसरले आहे. आगामी निवडणुकीत भाजप-सेनेची युती टिकेल काय? असा प्रश्न सदाभाऊ खोत यांना विचारला असता सदाभाऊ निरुत्तर झाले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com