akola railway station | Sarkarnama

खासदार संजय धोत्रेंनी घेतली अकोला रेल्वे स्टेशनची झाडाझडती

श्रीकांत पाचकवडे
गुरुवार, 6 जुलै 2017

अकोला : भुसावळ रेल्वे विभागीय समितीच्या अध्यक्षपदावर वर्णी लागल्यानंतर खासदार संजय धोत्रे यांनी गुरूवारी (ता.सहा) अकोला रेल्वे स्टेशनची पाहणी करून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. प्रशासनाकडून प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीचा समाचार घेत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे यांची नुकतीच भुसावळ रेल्वे विभागीय समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाली आहे. 

अकोला : भुसावळ रेल्वे विभागीय समितीच्या अध्यक्षपदावर वर्णी लागल्यानंतर खासदार संजय धोत्रे यांनी गुरूवारी (ता.सहा) अकोला रेल्वे स्टेशनची पाहणी करून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. प्रशासनाकडून प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीचा समाचार घेत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे यांची नुकतीच भुसावळ रेल्वे विभागीय समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाली आहे. 

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना मिळत असलेल्या गैरसोयीच्या अनेक तक्रारी लक्षात घेता, आज खासदार संजय धोत्रे यांनी थेट मध्य रेल्वेचे अकोला रेल्वे स्टेशन गाठत जनता दरबारच घेतला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, सरचिटणीस डॉ. विनोद बोर्डे, सागर शेगोकार, टोलू जयस्वाल, नगरसेविका सुमनताई गावंडे, सभापती सारिका जयस्वाल, नगरसेवक राहुल देशमुख, तुषार भिरड, अकोट नगरपालिकेचे गटनेता गजानन लोणकर, धनंजय गिरधर, गिरीष जोशी, विदर्भ चेंबरचे विजय पनपालिया यांच्यासह भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी खासदार धोत्रे यांनी रेल्वे स्थानक परिसराची पाहणी करून तेथील अस्वच्छता, प्रवाशांच्या आरक्षणासंदर्भातील अडचणी जाणून घेतल्या. रेल्वे स्टेशनवरील मालधक्का शिवणी-शिवापूर रेल्वे स्टेशनवर स्थानांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी रेल्वे प्रशासन सुद्धा तयार आहे. परंतु काही लोकांच्या विरोधामुळे मालधक्का स्थानांतरित करण्यासाठी उशीर होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

रेल्वे स्टेशनच्या बाहेर पार्किंगची समस्या वाढत चालली आहे. ती सोडवण्यासाठी प्रशासनाने रेल्वेच्या मालकीची खुली जागा वापरणे सोयीचे होईल. भुसावळ व नागपूर रेल्वे मंडळाच्या कार्यालयांवर कामाचा व रेल्वे वाहतुकीचा अत्याधिक व्याप असल्यामुळे उत्तर भारतकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या स्थानिक रेल्वे स्टेशनवरून जाण्यास अद्याप अनुकूलता नाही, परंतु त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे विस्तारीकरणाच्या योजना या बांधकाम व वन विभागाशी संबंधित असल्यामुळे पूर्ण होण्यास वेळ लागतो, असे सांगून त्यांनी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर रेल्वे स्टेशनवर काही सुविधा सुरू करण्यासंबंधी विचार करण्यात येत असल्याची माहिती दिली. 

रेल्वे स्टेशनवर लवकरच वाय-फाय 
प्रवाशांच्या सुविधेसाठी येत्या 15 ते 20 दिवसात रेल्वे स्टेशनवर वाय-फाय सुविधा सुरू करण्यात येईल. रेल्वे व गुगलचा संयुक्त उपक्रम असल्यामुळे वाय-फाय सुविधा सुरू करण्यास विलंब होत आहे, परंतु हे काम लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला देण्यात आल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सांगितले. 
 

संबंधित लेख