akola-prakash-ambedkar-madhukar-kamble | Sarkarnama

वंचितांच्या एकत्रिकरणास प्रकाश आंबेडकरांना झाला उशीर; मधुकरराव कांबळेंचा टोला

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

वंचित म्हणजे एक विशिष्ट समूदाय नव्हे. लहान-लहान घटकांनाही सोबत घेवून चालले तर खऱ्या अर्थाने वंचितांना न्याय देणे होईल, असे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकरराव कांबळे रविवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

अकोला : भारिप-बमंसचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितांना एकत्र करण्याच्या कार्याला फार उशिरा सुरुवात केली आहे. वंचित म्हणजे एक विशिष्ट समूदाय नव्हे. लहान-लहान घटकांनाही सोबत घेवून चालले तर खऱ्या अर्थाने वंचितांना न्याय देणे होईल, असे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकरराव कांबळे रविवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

मधुकर कांबळे म्हणाले, की केवळ समतेची भाषा केल्याने सामाजिक न्याय मिळणार नाही. आजही समाजात वंचितांची संख्या प्रचंड असल्याचे सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून अनेक याद्यांवर नजर टाकल्यास दिसून येईल. छोट्या-छोट्या घटकांना यात कुठेही स्थान नाही. याची विचारणा करणाऱ्यांना धडा शिकविला जातो. ही न्याय नाही. त्यामुळे वंचितांना एकत्र केले तरी त्यांना टिकवून ठेवणे आवश्‍यक आहे. यापूर्वीही ॲड. आंबेडकरांनी हा प्रयोग केला होता. आज मखराम पवारांसारखे कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर गेले असल्याचे कांबळे म्हणाले. 

भारिप-एमआयएम आघाडीचा फायदा भाजपलाच
भारिप प्रणित वंचित बहुजन आघाडी व एमआयएमची आघाडी ही भाजपच्या पथ्यावर पडणारी असून, त्यातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मोठे नुकसान होणार असल्याचे भाकित मधुकराव कांबळे वर्तविले. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाबाबत काँग्रेसनेही काहीही केले नाही. त्यामुळे विद्यमान भाजप सरकारशीही स्मारकाबाबत चर्चा केली. या सरकाराने मात्र स्माकर उभारण्यासाठी सत्कारात्मक प्रतिसाद दिला. स्मारक उभारण्याने सर्व प्रश्‍न सुटणार नसले तरी वंचितांना त्यांचे न्याय हक्क मिळविण्यासाठी उर्जा प्राप्त होत असल्याचे कांबळे म्हणाले. 

संबंधित लेख