akola prakash ambedkar congress | Sarkarnama

कॉंग्रेसचा बाळासाहेब आंबेडकरांशी आघाडीचा गुंता सुटेणा 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतांना जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षात सध्या उमेदवारीवरून शांतता पसरली आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आघाडीच्या चर्चेवरच कॉंग्रेसचे घोडे अकडले आहे. आंबेडकरांशी आघाडी न झाल्यास मागच्या निवडणुकीतील उमेदवार असलेले जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांना उमेदवारी मिळेल की शेजारच्या जिल्ह्यातून उमेदवार आयात करेल? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर सत्ताधारी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे भाजपचे खासदार संजय धोत्रे यांच्या हे अकोला लोकसभा मतदारसंघाचा गड चवथ्यांदा सर करण्यासाठी नियोजनबद्ध आखणी करीत आहेत. मात्र, मतदारसंघातील भाजपचे पारंपारीक प्रतीस्पर्धी असलेला कॉंग्रेस पक्ष आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी आघाडी करण्याच्या चर्चेतच अकडला आहे. 

एकीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश पातळीवरील नेते आंबेडकरांशी आघाडीसंदर्भात बोलणी करण्याचे म्हणत आहेत. मात्र, कॉंग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केवळ एकदाच बाळासाहेबांशी भेट घेतली. त्यानंतर कॉंग्रेसकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. 

अकोला लोकसभा मतदारसंघाच्या 2004, 2009, 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीतही कॉंग्रेससोबत आघाडी करण्यासंदर्भात आंबेडकरांनी तत्कालीन आमदार हरिदास भदे, आमदार बळीराम सिरस्कार आणि प्रा. अविनाश डोळस यांची सुकाणु समिती नेमली होती. या समितीने कॉंग्रेसच्या प्रदेश नेत्यांशी आघाडीचा प्रस्ताव देऊन चर्चेसाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, कॉंग्रेसच्या नेत्यांनी भारिप बमसंला आघाडीसंदर्भात शेवटपर्यंत झुलवित ठेवले होते. त्यामुळे मागील अनुभव लक्षात घेता आगामी निवडणुकीची व्युव्हरचना आखतांना आंबेडकरांनी वंचीत बहुजन आघाडीचीच राज्यभर मोट बांधण्यावर भर दिला आहे. 

आगामी काळात आंबेडकरांशी आघाडी न झाल्यास कॉंग्रेसला जिल्ह्यात सक्षम उमेदवार मिळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मागच्या निवडणुकीत कॉंग्रेसने मुस्लीम कार्ड वापरत जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांना उमेदवारी दिली होती. मात्र, आगामी निवडणुकीत हिदायत पटेल यांना उमेदवारी मिळणार की वाशिम जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख यांना उमेदवार देणार यावरच पक्षातंर्गत जोरदार चर्चा सुरू आहे. 

संबंधित लेख