akola politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मध्यप्रदेशात काँग्रेसची आघाडी, राजस्थानात बहुमत
छत्तीसगडमध्ये रमणसिंहांचे राज्य खालसा; काँग्रेस आघाडीवर
मध्य प्रदेशमध्ये भाजप पुढे, भाजप - 108 कॉंग्रेस - 106
छत्तीसगढ विधानसभा - काँग्रेस 44 जागांवर आघाडीवर
मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत
हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी घेणार तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट
राजस्थानमध्ये काॅंग्रेस 91 तर भाजप 70 जागांवर आघाडीवर

अकोल्यात मनसेची गांधीगिरी 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मे 2017

पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांची भासत असलेली चणचण अद्यापही दूर झालेली नाही. गत काही महिन्यांपासून शहरातील बहुतांश राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांच्या "एटीएम'मध्ये नोटांचा ठणठणात असल्याने नागरिक परेशान झाले आहेत. याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अकोट फैल भागातील स्टेट बॅंकेच्या एटीएमची पूजा करून अभिनव आंदोलन करीत नोटबंदीच्या निर्णयाचा निषेध केला. 

अकोला : पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांची भासत असलेली चणचण अद्यापही दूर झालेली नाही. गत काही महिन्यांपासून शहरातील बहुतांश राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांच्या "एटीएम'मध्ये नोटांचा ठणठणात असल्याने नागरिक परेशान झाले आहेत. याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अकोट फैल भागातील स्टेट बॅंकेच्या एटीएमची पूजा करून अभिनव आंदोलन करीत नोटबंदीच्या निर्णयाचा निषेध केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीच्या घेतलेल्या निर्णयाचे पडसाद अद्यापही दूर झालेले नाहीत. राष्ट्रीयीकृत व खासगी एटीएममध्ये पैशांची प्रचंड चणचण भासत आहे. शनिवारी, रविवारी आणि बॅंक सुट्यांच्या दिवसात तर एटीएम निव्वड शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. काही एटीएम केंद्र सुरू राहत असल्या, तरी मशिनमध्ये पैसे नसल्याने नागरिकांचा हिरमोड होत आहे.

अनेक एटीएम केंद्राच्या बाहेर एटीएम बंद, असे फलक लागले असल्याने नागरिकांना आपले पैसे काढताना भर उन्हात पायपीट करावी लागत आहे. एटीएम बंदच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगर उपाध्यक्ष चंदू अग्रवाल, आनंद चवरे, मनोज अढागळे, कलावती मानवटकर, राजेश पवार, रोहित बनसोड, रवी बनकर आदी पदाधिकाऱ्यांनी एटीएम मशिनची पूजा करून निषेध केला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या अभिनव आंदोलनाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

संबंधित लेख