akola politics | Sarkarnama

ये मेरा स्टाइल है : जी. श्रीकांत 

श्रीकांत पाचकवडे 
मंगळवार, 25 एप्रिल 2017

अकोला : शासनाच्या योजनांचा व्यापक प्रचार व प्रसिद्धी करून प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी आजवर प्रयत्न केला आहे. आपण केले तर इतरांनाही त्यातून प्रेरणा मिळेल, या उदात्त हेतूनेच आजवर काम केले. त्याला काही जणांनी पब्लिसिटी स्टंट म्हटले तर तो त्यांचा दृष्टिकोन आहे. मात्र, काम करताना काही चुका होतातच आणि त्यातून सुधारणेला वाव असतो. मी माझ्या पद्धतीने चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चर्चा तर होणारच. "ये मेरा स्टाइल है' असे म्हणत अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आपल्या अकोल्यातील कारकिर्दीबद्दल समाधान व्यक्त केले. 

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची नांदेड जिल्हाधिकारी पदावर बदली झाली. त्यांच्या बदलीच्या आदेशाची माहिती सोशल मिडीयावर वाऱ्यासारखी पसल्यानंतर त्यांच्या समर्थनात आणि विरोधात अनेक पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे निव्वळ प्रसिद्धीसाठी हपापले असून त्यांचे अनेक किस्से सोशल मिडीयावर टाकत त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. 

अकोल्यातून पदभार सोडण्यापूर्वी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळावा, योजनांची यशस्वी अंमलबजावणी व्हावी म्हणून आपण थोडे हटके काम केले. त्याचा जिल्ह्याच्या विकासासाठी फायदाच झाला आहे. आपण स्वतः केले तर इतरांना त्यातून प्रेरणा मिळेल म्हणूनच शौचालय बांधकाम, श्रमदान, स्पर्धा परीक्षा वर्ग अशा अनेक लोकहिताच्या उपक्रमांसाठी पुढाकार घेतला. जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम करताना काही कठोर निर्णय घेतले. त्यातूनच काही जण निश्‍चितच दुखावले असतील. पण ते निर्णय शासनाच्या नियमानुसार आणि अकोलेकरांच्याच हिताचे होते. प्रत्येकाची काम करण्याची आपली पद्धत असते. माझीही वेगळी पद्धत आहे. 

पीएमओ ऑफीसही गाठू 
अकोल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी हे माझ्यासाठी आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. रेल्वेत नांदेड येथे तिकीट कलेक्‍टर म्हणून काम केले. नोकरी करीत असताना जिद्दीने अभ्यास केला आणि आयएएस झालो. परिविक्षाधीन कार्यकाळ नांदेड येथेच श्रीकर परदेशी यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केला. योगायोग म्हणावा की काय नंतरची पोस्टिंग नांदेड महापालिका आयुक्त म्हणून झाली. आणि गत दोन वर्षापूर्वी अकोला जिल्हाधिकारी म्हणून काम करतोय. आता पुन्हा नांदेड जिल्हाधिकारी पदावर जात आहे. श्रीकर परदेशी यांनी जिथे जिथे काम केले. त्यांच्या खुर्चीत बसण्याची संधी मिळाली. त्यामुळे नशीब असेल तर पीएमओ ऑफीसही गाठू, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केली

संबंधित लेख