akola politics | Sarkarnama

जी. श्रीकांत ठरले उत्कृष्ट जिल्हाधिकारी 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

अकोला : शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून लोकाभिमुख प्रशासन चालविणारे अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे उत्कृष्ट जिल्हाधिकारी ठरले आहेत. नागरी सेवादिनानिमित्त आज मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येत आहे. 

नागरी सेवा दिनानिमित्त प्रत्येक वर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव केला जातो. यावर्षी अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. गेल्या दोन वर्षात अकोला जिल्हाधिकारी म्हणून विविध विकास कामांचा धडाका, सर्व अधिकाऱ्यांसोबत उत्तम समन्वय ठेवत एक टीम तयार केली. कायद्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यासोबतच माणुसकीची जाणीव असल्यामुळे कामाची तत्परता हा त्यांचा स्थायीभाव आहे. 

रेल्वेमध्ये तिकीट कलेक्‍टर ते डिस्ट्रिक्‍ट कलेक्‍टर हा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी राहिला आहे. मिशन दिलासा, जलयुक्त शिवार, संजय गांधी निराधार योजना, ऑनलाइन फेरफार, स्पर्धा परीक्षा असे विविध उपक्रम त्यांनी जिल्ह्यात प्रभावीपणे राबविले. जी. श्रीकांत यांच्या लोकाभिमुख प्रशासनाची शासनाने दखल घेत त्यांची उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड केली आहे. 

संबंधित लेख