Akola politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाची वऱ्हाडात पेटतेय धग 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 एप्रिल 2017

अकोला : राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी संघर्ष यात्रा काढत सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. या आंदोलनाची धग वऱ्हाडातही पेटली असून सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. वऱ्हाडातील अकोला, वाशीम,बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांत कर्जमुक्तीसाठी आंदोलने होत असल्याने सरकारसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. 

अकोला : राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी संघर्ष यात्रा काढत सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. या आंदोलनाची धग वऱ्हाडातही पेटली असून सरकार विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. वऱ्हाडातील अकोला, वाशीम,बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांत कर्जमुक्तीसाठी आंदोलने होत असल्याने सरकारसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. 

निसर्गाची अवकृपा व शेतकऱ्यांप्रती शासनाच्या उदासीन धोरणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. डोक्‍यावर असलेले बॅंक, सावकारांचे कर्ज फेडण्याची चिंता आणि कुटुंबांच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळणे कठीण होत असल्याने शेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढत आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून बळीराजाला मदतीचा हात देण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टीने कंबर कसली आहे. याच मागणीसाठी अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधी पक्षांच्या सदस्यांनी कर्जमाफीच्या घोषणा दिल्यामुळे विरोधी पक्षाच्या एकोणीस आमदारांना निलंबित करण्यात आले होते. त्या दिवशीपासून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभागृहातील कामकाजावर विधानसभेत बहिष्कार घातला होता. 

सरकार सभागृहात न्याय देत नसल्यामुळे हा प्रश्न जनतेच्या न्यायालयातच मांडायचा निर्णय घेऊन चांदा ते बांदा अशी संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा भाग म्हणून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा पंधरा एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथून सुरू होणाऱ्या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात यात्रा बुलडाणा, जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पालघर जिल्ह्यातून जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ता डॉ. सुधीर ढोणे यांनी दिली. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी घेतला असतानाच स्थानिक पातळीवर शेतकरी संघटना, सामाजिक संघटनांनी या आंदोलनात उडी घेत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी रास्ता रोको, धरणे आंदोलन, पुतळा दहन यासह प्रशासनाला निवेदन देण्यासाठी संघटना सरसावल्या आहेत.  

 
 

संबंधित लेख