Akola politician start Public elations exercise in gaanesh visarjan miravnuk | Sarkarnama

अकोल्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुक मार्गावर  राजकीय नेत्यांचे मंडप !

मनोज भिवगडे  
रविवार, 23 सप्टेंबर 2018

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने अकोल्यात निवडणुकांचा हंगाम सुरु झालाय याची जाणीव मतदारांना झाली . 

अकोला :  अकोल्यात  अकोल्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुक मार्गावर  राजकीय नेत्यांनी  गणेश भक्तांसाठी चहा नाश्ता आणि पाणी मिळावे म्हणून मंडप उभारले . गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने अकोल्यात निवडणुकांचा हंगाम सुरु झालाय याची जाणीव मतदारांना झाली . 

भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांच्यासह भाजप महानगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी गणेश भक्तांच्या स्वागताची तयारी केली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी भाजप नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे.

काॅग्रेसचे मुस्लिम नेते माजी राज्यमंत्री अजहर हुसैन, युवा नेते नगरसेवक डाॅ. झिशान हुसैन आणि महापालिका विरोधी पक्षनेते साजीद खान पठान यांचीसुद्धा गणेश भक्तांच्या स्वागताची तयारी केली आहे. काँग्रेस महानगराध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी भाविकांचे स्वागत करीत मिरवणुकीत सहभागी झाले होते.

सकाळी सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत महाआरती झाली .  मिरवणुकीला सुरवात झाली तेंव्हा    पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, गोवर्धन शर्मा  असे मातब्बर स्वतः हजर होते . 

भारतीय जनता पार्टी, शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी गणेश भक्तांच्या स्वागतासाठी जागोजागी मंडप उभारले आहे. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक चालणार असल्याने भाविकांसाठी प्रसाद, फराळ आणि चहापानची व्यवस्थाही करण्यात आली आहे. काही राजकीय नेत्यांची गणेश मंडळेही मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.

येथील गांधी चौकात माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामदादा गुलाबराव गावंडे यांनी गणेश मंडळाच्या स्वागतासाठी मंडप उभारला. मिरवणुकीत सहभागी गणेश मंडळाना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह शिवसेना नेत्यांनी बाजोरिया यांच्या गांधी रोड स्थित कार्यालयापुढे मंडप उभारला आहे .

 भाविकांना व मिरवणुकीत सहभागी मंडळांच्या सदस्यांचे स्वागत केले जात आहे. दोन्ही नेत्यांची मंडपं काही फुटाच्या अंतरावरच आहे. गावंडे व बाजोरिया हे महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेत एकत्र होते. आता गावंडे राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये  गेल्याने आणि संग्रामदादा गावंडे यांच्याकडे प्रथमच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद आले असल्याने दोन्ही नेत्यांमध्ये गणेश भक्तांच्या स्वागताची चढाओढ लागली आहे.  

 

 

संबंधित लेख