Akola poitics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

अकोला भाजपमध्ये "फोटो वॉर' 

श्रीकांत पाचकवडे
शनिवार, 27 मे 2017

शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षात गत काही वर्षांपासून कुरघोडीचे राजकारण वाढले आहे. गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आणि खासदार संजय धोत्रे गटात सुरू असलेल्या शितयुद्धात सध्या "फोटो वॉर' सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ठयद्विपूर्ती सोहळ्यास शुभेच्छा जाहिरातीमध्ये खासदार धोत्रे गटाचे समजल्या जाणाऱ्या महापौर विजय अग्रवाल यांनी रणजित पाटलांच्या फोटोला डच्चू दिल्याने सोशल मिडीयावर या जाहिरातीवरून चर्चेला उधान आले आहे. 

अकोला : शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षात गत काही वर्षांपासून कुरघोडीचे राजकारण वाढले आहे. गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आणि खासदार संजय धोत्रे गटात सुरू असलेल्या शितयुद्धात सध्या "फोटो वॉर' सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ठयद्विपूर्ती सोहळ्यास शुभेच्छा जाहिरातीमध्ये खासदार धोत्रे गटाचे समजल्या जाणाऱ्या महापौर विजय अग्रवाल यांनी रणजित पाटलांच्या फोटोला डच्चू दिल्याने सोशल मिडीयावर या जाहिरातीवरून चर्चेला उधान आले आहे. 

गत काही वर्षांपासून जिल्ह्यात विकास कामांच्या मुद्यावरून भाजपमध्ये अंतर्गत श्रेयवादाची लढाई सुरू आहे. केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधीचा निधी खेचून आणत भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधिर सावरकर यांनी विकास कामांचा धडाका सुरू केला आहे. विकास कामात रणजित पाटील यांचाही पुढाकार असला तरी पक्षातंर्गत कुरघोडीच्या राजकारणातून दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करून शह-काटशहाचे राजकारण वाढीस लागले आहे.

अकोला शहरात नुकतेच वीस कोटी रुपये निधीतून लावण्यात येणाऱ्या एलईडी उद्घाटनाच्या पोस्टरवरून राजकारण तापले होते. या प्रकल्पासाठी शासनाकडून कोट्यवधीचा निधी खेचून आणणाऱ्या आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांचे फोटो निमंत्रण पत्रिकेवर वगळण्यात आले होते. ज्या आमदारांनी निधी खेचून आणला त्यांनाच डावलण्यात आल्याने पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी टिकेची झोड उठवली होती. हा विषय संपत नाही तोच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या षष्ठ्यद्बिपूर्ती सोहळ्यास महापौर विजय अग्रवाल यांनी दिलेल्या शुभेच्छा जाहिरातीमध्ये डॉ. रणजित पाटील यांचा फोटो न टाकता "हिसाब बराबर' करण्याचा प्रयत्न केल्याने या मुद्यावरही आता राजकारण रंगण्याची शक्‍यता आहे. 

संबंधित लेख