Akola-news - Sudhir-Dhone | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

मोदी सरकारचे धोरण म्हणजे 'श्रीमंतांना साथ, गरिबांना लाथ' : डॉ. सुधीर ढोणे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

केंद्रातील मोदी सरकार 'सबका साथ सबका विकास' असा नारा देत असले तरी प्रत्यक्षात मात्र सरकारचे धोरण हे उद्योगपती धार्जिणे, श्रीमंतांना खुष करणारे व गरिबांवर अन्याय करणारे आहे. भारत सरकारच्या मालकीची असलेल्या भारतीय स्टेट बँकेने 31 जुलैपासून ग्राहकांच्या बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली असून 1 करोड रूपयांपेक्षा कमी रक्कमेवर 3.5 टक्के तर 1 कोटीपेक्षा अधिक रकमेवर 4 टक्के व्याजदर ठेवून सरकारने श्रीमंतांना साथ, गरीबांना लाथ या मोदी सरकारच्या धोरणाचा प्रत्यय आणून दिल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे.

अकोला : केंद्रातील मोदी सरकार 'सबका साथ सबका विकास' असा नारा देत असले तरी प्रत्यक्षात मात्र सरकारचे धोरण हे उद्योगपती धार्जिणे, श्रीमंतांना खुष करणारे व गरिबांवर अन्याय करणारे आहे. भारत सरकारच्या मालकीची असलेल्या भारतीय स्टेट बँकेने 31 जुलैपासून ग्राहकांच्या बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली असून 1 करोड रूपयांपेक्षा कमी रक्कमेवर 3.5 टक्के तर 1 कोटीपेक्षा अधिक रकमेवर 4 टक्के व्याजदर ठेवून सरकारने श्रीमंतांना साथ, गरीबांना लाथ या मोदी सरकारच्या धोरणाचा प्रत्यय आणून दिल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे.

डॉ. ढोणे म्हणाले, ``मार्च 2003 मध्ये केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार असताना मार्च 2003 मध्ये ग्राहकांच्या बचत खात्यातील रकमेवर व्याजदर 3.5 टक्के करण्यात आला. त्यानंतर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने तो वाढवून 4 टक्के केला होता. मोदी सरकारने परत हा व्याजदर 3.5 टक्के करून देशातील कोट्यावधी मध्यमवर्गीयांचे आर्थीक नुकसान केले आहे." 

बॅंकांची कर्जे बुडवणाऱया उद्योगपतींवर कारवाई करण्याऐवजी सरकार मध्यमवर्गीय जनतेच्या पोटावर लाथ मारत असल्याचा आरोपही डॉ. सुधीर ढोणे यांनी केला आहे. 

संबंधित लेख