Akola news - MP Sanjay Dhotre | Sarkarnama

भुसावळ विभागीय रेल्वे समितीच्या अध्यक्षपदी खासदार संजय धोत्रे 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 जून 2017

अकोला : भारतीय रेल्वे भुसावळ विभागीय रेल्वे समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे तर नागपूर विभागीय रेल्वे समितीच्या अध्यक्षपदी खासदार रामदास तडस यांची निवड करण्यात आली आहे. 

अकोला : भारतीय रेल्वे भुसावळ विभागीय रेल्वे समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे तर नागपूर विभागीय रेल्वे समितीच्या अध्यक्षपदी खासदार रामदास तडस यांची निवड करण्यात आली आहे. 

नागपूर व भुसावळ रेल्वे विभागीय मंडळाच्या अध्यक्षपदाची निवड करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले होते. त्यानुसार नागपूर येथे खासदारांची बैठक नागपूर येथे झाली. या बैठकीला खासदार संजय धोत्रे (अकोला), ए. टी. नाना पाटील (जळगाव), प्रतापराव जाधव (बुलढाणा), कृपाल तुमाने (रामटेक), ज्योती धुर्वे (बैतुल), डॉ. विकास महात्मे (राज्यसभा), मध्य रेल्वेचे महाप्रबंधक दिनेशकुमार शर्मा, नागपूर मंडळ रेल्वे प्रबंधक दीक्षित आदी वरिष्ट अधिकारी उपस्थित होते. या वेळी भुसावळ रेल्वे विभागीय समितीच्या अध्यक्षपदी खासदार संजय धोत्रे यांची तर नागपूर विभागीय रेल्वे समितीच्या अध्यक्षपदी खासदार रामदास तडस यांची सर्व खासदारांनी एकमताने निवड केली.
 
संबंधित लेख