Akola news - Keshav-Upadhye-PM | Sarkarnama

अच्छा, तो आप मिडीयामे छाये हुए लोग हो ! 

श्रीकांत पाचकवडे 
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

अकोला : दुपारची वेळ... देशाचे पंतप्रधान यांच्या कॅबीनमध्ये आम्ही आठ-दहा पदाधिकारी भेटीसाठी आत शिरलो. कॅबीनमध्ये प्रवेश करताच, "आओ वेलकम.. तो आप मिडीयामे छाये हुवे लोग हो' असे म्हणत केलेले उत्स्फुर्त स्वागत स्वीकारत आम्ही भावविभोर झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सकारात्मक प्रतिसाद पाहून अधिक जोमाने काम करण्याची नवचेतना मिळाली, असे उद्‌गार भाजपचे महाराष्ट्रातील प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काढले. 

राजकारणात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद नेहमीच रंगतो. एखादा निर्णय, योजना किंवा घटनेवर प्रसिद्धी माध्यमांमध्ये विरोधकांकडून होणाऱ्या शाब्दीक हल्ल्यांना प्रतिउत्तर देताना सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्‍त्याची कसोटीच लागते. अशा वेळी प्रवक्‍त्यांनी अधिक अभ्यासपूर्ण होणे महत्वाचे असते. केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप सरकारची भूमिका खंबीरपणे माध्यमांसमोर मांडण्याचे काम महाराष्ट्रातील भाजपचे आठ प्रवक्ते करीत आहेत. या प्रवक्‍त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, निर्णयांची सखोल माहिती होण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात दोन दिवसांचा दिल्ली अभ्यास दौरा नुकताच झाला. या दौऱयात उपाध्ये हेही सहभागी झाले होते. हा अभ्यास दौरा माहितीच्या दृष्टीकोणातून खूपच उपयुक्त ठरल्याचे केशव उपाध्ये यांनी सांगितले.

संबंधित लेख