Akola news : corporation politics | Sarkarnama

अकोला महापालिकेच्या सभेत विरोधी पक्षनेत्यांनी केली तोडफोड 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 जून 2017

अकोला  शहरातील स्वच्छता, घरकुलांचे बांधकामासह सत्ताधारी भाजपने केलेल्या करवाढीला तीव्र विरोध करीत आक्रमक झालेले कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी बुधवार (ता.28) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तोडफोड केली. यावेळी नुकसानाची भरपाई पठाण यांच्या मानधनातून करण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला दिले. 

अकोला : शहरातील स्वच्छता, घरकुलांचे बांधकामासह सत्ताधारी भाजपने केलेल्या करवाढीला तीव्र विरोध करीत आक्रमक झालेले कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी बुधवार (ता.28) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तोडफोड केली. यावेळी नुकसानाची भरपाई पठाण यांच्या मानधनातून करण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला दिले. 

अकोला महापालिकेची आजची सर्वसाधारण सभा वादळी ठरली. सभेला सुरूवात होताच महापौरांनी विषय पत्रिकेवरील विषयांना मंजुरी देण्याचे निर्देश दिले. मात्र, विषय मंजुर करण्याआधी त्यावर चर्चा तर करा, अशी मागणी विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, शिवसेनेचे गटनेते मनोज मिश्रा यांच्यासह नगरसेवकांनी केली. 

महापौरांनी थेट विषय मंजूर म्हणत एक-एक विषय वाचालयाला सांगितल्यावर आक्रमक झालेल्या विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी महापौर विजय अग्रवाल मनमाणी कारभार करीत असल्याचा आरोप केला. त्यावर बराच वेळ त्यांच्यात खडाजंगी झाली. महापौर नगरसेवकांची भावना समजूत घेत नसून मनमाणी कारभात करीत असल्याचे म्हणत साजिद खान पठाण यांनी सभागृहातील डायस पाडले. तसेच माईकचीही तोडफोड केली. त्यानंतर महापौरांनी या नुकसानाची भरपाई पठाण यांच्या मानधनातून करण्याचे निर्देश देत यापुढे असा प्रकार केल्यास निलंबणाची कारवाई करण्याचा इशारा दिला.

त्यावर साजिद खान पठाण यांनीही प्रतीउत्तर देत जनतेच्या प्रश्नानासाठी कितीही वेळा निलंबीत करा आम्ही तयार असल्याचे आव्हान महापौरांना दिले. या गोंधळातच अनेक विषयांना मंजुर देण्यात आली. त्याला विरोधी पक्ष कॉंग्रेस, शिवसेनेसह सत्ताधारी भाजपच्याही काही नगरसेवकांनी विरोध करीत महापौर अग्रवाल यांना कोंडीत पकळण्याचा प्रयत्न केला. 

संबंधित लेख