akola mla sharma | Sarkarnama

"हर बोला महादेव' चा गजर करीत आमदार शर्मांनी धरला ठेका

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

अकोला : शहराचे आराध्यदैवत राज राजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी गांधीग्राम येथुन आलेल्या हजारो कावडधारी शिवभक्तांचे अकोलेकरांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिशन बाजोरिया, भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्यासह सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी "हर बोला महादेव' चा गजर करीत पालखी मिरवणुकीत ढोल ताश्‍याच्या नांदावर ठेका धरला. 

श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अकोला शहराचे आराध्य दैवत राज राजेश्वराला गांधीग्राम येथील पुर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची 71 वर्षांची परंपरा आहे. सोमवारी (ता.21 ) खांद्यावरून सर्वाधीक भरण्याची कावड भरून आणण्याची स्पर्धा कावडधारी मंडळांमध्ये लागते. सकाळीच अनेक मंडळांचे शहरात आगमन झाले. सर्वाधिक भरणे असलेली कावड डाबकी रोडवासी मित्र मंडळाची असून यंदा 771 भरण्यांची कावड काढण्यात आली. त्यापाठोपाठ हरिहरपेठमधील जय भवानी मित्र मंडळाची 751 भरण्याची कावड, मानाचे स्थान असलेल्या हरिहर शिवभक्त मंडळाची 401 आणि सर्वाधिक 4 हजार सदस्य असलेल्या जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाची 111 भरण्यांची कावड अकोलेकरांसाठी आकर्षण ठरली. 

यासह सर्व मंडळांच्या पालखीचे आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिशन बाजोरिया, महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, किशोर मांगटे पाटील, डॉ विनोद बोर्डे, डॉ किशोर मालोकार, धनंजय गिरीधर, नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे, सतीष ढगे, सुनिल क्षीरसागर, टोलु जयस्वाल, गिरीष जोशी, संजय जिरापुरे, निलेश ठेवा, दिलीप सागळे, अनुप गोसावी, अधिराज गोंडले, यांच्यासह अनेक राजकीय, सामाजीक संघटनांच्या पदाधिकार्यांनी स्वागत केले. 

संबंधित लेख