आमदार लखन मलिक यांच्या प्रवासाने 'लालपरी' झाली खूष

लोकशाही शासनव्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक असतात ही आता केवळ अंधश्रद्धा झाली आहे. महागड्या मोटारीचा ताफा जेवढा मोठा तेवढा आमदार मोठा ही वास्तविकता असताना सत्ताधारी भाजपचे वाशीमचे आमदार लखन मलिक मात्र याला अपवाद आहेत. शहरात फिरताना त्यांना कोणतेही वाहन लागत नाही. मात्र, अकोल्याच्या दवाखान्यात जाताना त्यांनी आपल्या अर्धांगिनीसोबत एसटीने प्रवास केला. आमदार खरोखर एसटीत बसले हे पाहण्यासाठी अनेकांनी याच गाडीने प्रवास केला. परिणामी वाशीम ते अकोला ही गाडी कधी नव्हे ती फुल्ल झाली.
आमदार लखन मलिक यांच्या प्रवासाने 'लालपरी' झाली खूष

वाशीम : लोकशाही शासनव्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक असतात ही आता केवळ अंधश्रद्धा झाली आहे. महागड्या मोटारीचा ताफा जेवढा मोठा तेवढा आमदार मोठा ही वास्तविकता असताना सत्ताधारी भाजपचे वाशीमचे आमदार लखन मलिक मात्र याला अपवाद आहेत. शहरात फिरताना त्यांना कोणतेही वाहन लागत नाही. मात्र, अकोल्याच्या दवाखान्यात जाताना त्यांनी आपल्या अर्धांगिनीसोबत एसटीने प्रवास केला. आमदार खरोखर एसटीत बसले हे पाहण्यासाठी अनेकांनी याच गाडीने प्रवास केला. परिणामी वाशीम ते अकोला ही गाडी कधी नव्हे ती फुल्ल झाली.

वाशीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार लखन मलिक यांची आमदारकीची चाैथी टर्म आहे. सलग तीन पंचवार्षिक निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत. साधा माणूस म्हणून त्यांची मतदारसंघात ओळख आहे. विजयाचा उन्माद अन् पदाचा बडेजाव त्यांनी कधीच जवळ येऊ दिला नाही. घरून कार्यालयापर्यंत बहुतेकदा ते चालत येतात. आज त्यांच्या पत्नीला अकोला येथे दवाखान्यात जायचे होते. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून गावखेड्यावर सोबत करणारी एकमेव गाडी रूसली. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्याला बस स्थानकावर सोडण्यास सांगीतले. त्यानेही आमदाराला बसस्थानकात सोडले.

अकोल्याला जाणारी गाडी आली आमदार सपत्निक बसले. वाहक जेव्हा तिकीट देण्यासाठी आला तेव्हा त्याचाही डोळ्यावर विश्वास बसला नाही. आमदार एसटीने प्रवास करतात ही बाब अकोला येईपर्यंत तो सांगत होता. परिणामी पातुर पर्यंत एसटीतल्या आमदाराला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. काहींनी प्रवासासाठी हिच बस निवडली. परिणामी लाल परीही खुष झाली. आमदार लखन मलिक हे गोरगरीबांचे आमदार म्हणून मतदार संघात ओळखले जातात. त्यांच्या याच साधेपणामुळे ते चार वेळा विधानसभेत पोचले. जिल्ह्यातील काही आमदारांचे गाडीच्या काचातून दर्शन दुर्लभ होत असताना व त्यांच्या गाड्यांच्या ताफ्याने सामान्य माणूस चक्रावून जात असताना आमदार लखन मलिकांचा हा साधेपणा नक्कीच दखल घेण्याजोगा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com