Akola Farmers Suicede Attemt at Mantralaya | Sarkarnama

अकोल्यातील शेतकऱ्याने मंत्रालयात केले विषप्राशन

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या अकोले तालुक्यातील मल्याळे गावातील भैरवनाथ जाधव या शेतकऱ्याने काल मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती गंभीर असून, मुंबईच्या सेंट जाॅर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नगर : कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या अकोले तालुक्यातील मल्याळे गावातील भैरवनाथ जाधव या शेतकऱ्याने काल मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती गंभीर असून, मुंबईच्या सेंट जाॅर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कर्जबाजारीपणाला कंटाळून जाधव यांनी यापूर्वी कोरड्या विहिरीत बसून उपोषण सुरू केले होते. हे उपोषण सोडण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांनी मध्यस्थी केली होती. खासदारांनी दिलेले आश्वासनांची पूर्तता झाली नाही. मंत्रालयाच्या पातळीवरून साह्य केले जात नाही. या कारणाने त्यांनी सोमवारी मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आपल्या सात-बारा उतारा कोरा होत नाही ही त्यांची तक्रार होती. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, ही जाधव यांची मागणी होती.

 

संबंधित लेख