दिवाकर रावतेंनी केले आपल्या शिष्याचे "बर्थ डे सेलीब्रेशन' 

अशा राजकारण्यांमध्ये शिवसेना नेते तथा राज्याचे परिवनमंत्री दिवाकर रावते यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल.
दिवाकर रावतेंनी केले आपल्या शिष्याचे "बर्थ डे सेलीब्रेशन' 

अकोला : राजकारणात नेत्यांचे वाढदिवस कार्यकर्ते मोठ्या उत्साहात साजरे करताना आपण पाहतो. मात्र, निष्ठावंत कार्यकर्त्याच्या वाढदिवसाची आठवण ठेवत वाढदिवस साजरा करणारे काही मोजकेच राजकारणी असतात. अशा राजकारण्यांमध्ये शिवसेना नेते तथा राज्याचे परिवनमंत्री दिवाकर रावते यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल.

गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपले दैवत आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांना राजकीय गुरू मानणारे शिवसेनेचे पश्‍चिम विदर्भ कायदे विभाग प्रमुख डॉ. अनिल काळे यांचा वाढदिवस दिवाकर रावते यांनी साजरा करून आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांला अनोखी भेट दिली.

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ म्हणून परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा नावलौकीक आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या तालमीत मोठे झालेले दिवाकर रावते हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून गणले जातात. गेल्या 50 वर्षाच्या राजकीय जीवनात रावते यांनी बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक तयार करण्याचा संकल्प पुढे नेण्याचे काम यशस्वीपणे केले आहे. बोली भाषेत अत्यंत कडक असणारे दिवाकर रावते वैयक्तिक जीवनात मात्र, संवेदनशील आणि हळव्या मनाचे असल्याचा प्रत्यय त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अनेकदा अनुभवला आहे. कार्यकर्ता जोडणे आणि जपण्याची कला रावतेंना अवगत आहेच. त्यातही विशेष म्हणजे विदर्भातील शिवसैनिकांना नावानिशी ओळखत त्यांना आपले करून घेण्यावर त्यांचा भर राहिला आहे.

अकोल्यातील अनिल काळे हे रावतेंचे निष्ठावंत समर्थक समजले जातात. गेल्या 30 वर्षांच्या राजकीय जीवनात रावतेंना आपले राजकीय "गुरू' मानत असलेले अनिल काळे आणि रावते यांचे गुरू-शिष्याचे ऋणानुबंध जुळले आहेत. श्री. रावते आज अकोल्यात वक्ता प्रशिक्षण शिबीरासाठी आले असता त्यांनी डॉ. विनीत हिंगणकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आपल्या शिष्याच्या वाढदिवसाची आठवण ठेवत दिवाकर रावतेंनी अनिल काळे यांना वाढदिवस साजरा करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या गुरूनेच बर्थ डे सेलिब्रेट केल्याने काळे यांना यावर्षी खऱ्या अर्थाने "हॅप्पी बर्थ डे'ची अनुभूती आली. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना सहाय्यक संपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, माजी जिल्हा प्रमुख विजय मालोकार, डॉ. विनीत हिंगणकर, गोपाल दातकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com