नवनिर्माण करणारी शिवसेना अधिक प्रखर करा : दिवाकर रावते 

प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जनकल्याणाच्या विचारांचा वारसा आपल्या सर्वांना पुढे न्यायचा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे विचार प्रत्येकाच्या मनात रुजविताना शिवसेनेची प्रतिभा, शिस्त जपणे आवश्‍यक आहे. नवनिर्माण करण्याचा ध्यास मनात रुजवून कालांतराने बदलणारी शिवसेना अधिक प्रखर करा, असे बौद्धीक शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शिवसैनिकांना दिले.
नवनिर्माण करणारी शिवसेना अधिक प्रखर करा : दिवाकर रावते 

अकोला : प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जनकल्याणाच्या विचारांचा वारसा आपल्या सर्वांना पुढे न्यायचा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे विचार प्रत्येकाच्या मनात रुजविताना शिवसेनेची प्रतिभा, शिस्त जपणे आवश्‍यक आहे. नवनिर्माण करण्याचा ध्यास मनात रुजवून कालांतराने बदलणारी शिवसेना अधिक प्रखर करा, असे बौद्धीक शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शिवसैनिकांना दिले. 

येथील प्रमिलाताई ओक हॉलमध्ये सोमवार (ता.11) शिवसेनेच्या पश्‍चिम विदर्भ वक्ता प्रशिक्षण शिबीरात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानगुडे-पाटील, शशांक मोहिते, खासदार प्रतापराव जाधव, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, अकोला जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, सहाय्यक संपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, अमरावती कायदे विभागप्रमुख डॉ. अनिल काळे, डॉ. विनीत हिंगणकर, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, महादेवराव गवळे, अमरावतीचे जिल्हाप्रमुख संजय बंड, जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, जिल्हाप्रमुख सुनिल खराटे, बुलडाणा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, वाशिम जिल्हाप्रमुख राजेश पाटील, यवतमाळ जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, माजी संजय गावंडे, गजानन दाळू गुरुजी, ज्योत्स्नाताई चोरे, महानगराध्यक्ष राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, योगेश अग्रवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी परिवहन मंत्री रावते म्हणाले, की देशाच्या राजकारणात वयाच्या 85 व्या वर्षी हाताचे केवळ एक बोट वर केले तर लाखोंचा जनसमुदाय उभे करणारे नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते. आज बाळासाहेब आपल्यात नाहीत. मात्र, त्यांचे विचार प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात ठासुन भरलेले आहेत. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि आदित्य ह्या चार पिढ्या पाहण्याचे भाग्य शिवसैनिकांना लाभले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या शिस्तीचा संस्कार रुजविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वक्ता प्रशिक्षण शिबीर घेण्याचे ठरविले आहे. या शिबीराच्या माध्यमातून सेनेची शिस्त, संस्कार आणि प्रतिभावंत वकृत्वाचे गुण प्रत्येक शिवसैनिकाने आचरणात आणणे गरजेचे आहे. माझ्या राजकीय जिवनात मी कधीही शरद पवार साहेबांवर टिका केली नाही. कारण आपली उंची आणि माझं स्थान काय आहे हे बघूनच कुणावर टिका करायची असते, असेही रावते म्हणाले. यावेळी प्रा. बानगुडे-पाटील पाटील, शशांक मोहिते यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com