akola district | Sarkarnama

अकोल्याची नवी ओळख, आत्महत्यांचा जिल्हा !

योगेश फरपट
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

अकोला : जिल्ह्यात सर्वाधिक शेतळ्यांची निर्मिती झाल्याने अकोल्याची ओळख शेततळ्यांचा जिल्हा, अशी झाल्याचा दावा राजकारण्यांनी केला होता. मात्र, आज त्याच जिल्ह्याची ओळख सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा, अशी झाली आहे. चालू वर्षात 110 तर गेल्या 16 वर्षांत एक हजार 961 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव आहे. 

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या शेतीत राबवणाऱ्या शेतकऱ्यांची काही वर्षापासून दैनावस्था झाली आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतीत काबाडकष्ट करूनही कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पेलू न शकणारा बळीराजा नैराश्‍यग्रस्त होऊन आत्महत्येकडे वळत आहे. सरकारने जाहीर केलेले पॅकेज आणि योजना शेतकरी आत्महत्या थांबवण्यात निकामी ठरत आहे. 

अकोला जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मोठा गाजावाजा करीत "मिशन दिलासा' हा अभिनव उपक्रम सुरू केला. सुरवातीच्या काळात लोकसहभागातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसाठी तसेच नैराश्‍यग्रस्त शेतकऱ्यांसाठी रोजगाराची साधने उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या बदलीनंतर "नवा गडी नवा राज'प्रमाणे प्रशासनाचे या उपक्रमाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे जिल्ह्यातील आत्महत्यांच्या एकत्रित आकडेवारीवरून दिसून येते. 

दृष्टीक्षेपात शेतकरी आत्महत्या 
वर्ष - शेतकरी आत्महत्या 
वर्ष - शेतकरी आत्महत्या 
2001 -06 
2002 - 07 
2003 - 19 
2004 - 46 
2005 - 41 
2006 - 174 
2007-125 
2008-165 
2009-136 
2010-200 
2011-177 
2012-178 
2013-136 
2014-195 
2015-165 
2016-109 
2017-91 

संबंधित लेख