akola congress agitation against modi government | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

`देश का चौकीदार चोर है' म्हणत कॉंग्रेसचे अकोल्यात आंदोलन 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 24 डिसेंबर 2018

मोदी सरकारने राफेल हेलिकॅप्टर सौद्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत मोदी सरकारच्या या खरेदीची संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार (ता.24) धरणे आंदोलन केले. "देश का चौकीदार चोर है...' अशी घोषणाबाजी करीत कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. 

अकोला : मोदी सरकारने राफेल हेलिकॅप्टर सौद्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत मोदी सरकारच्या या खरेदीची संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार (ता.24) धरणे आंदोलन केले. "देश का चौकीदार चोर है...' अशी घोषणाबाजी करीत कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. 

मोदी सरकारने राफेल हेलिकॅप्टर सौद्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत कॉंग्रेसने देशभर आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. अकोल्यात सोमवारी कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष तथा माजी आमदार बबनराव चौधरी, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, डॉ. अभय पाटील, महापालिकेचे विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण, नगरसेवक नौशाद खान, माजी उपमहापौर निखीलेश दिवेकर, महानगर महासचिव कपिल रावदेव, मोहम्मद इरफान, अजहर इक्‍बाल, फैजल खान, वामनराव थोटांगे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना निवेदन दिले. 

यावेळी बबनराव चौधरी म्हणाले, की मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात खोटे शपथपत्र सादर करुन एक दिवसाचा तात्पुरता दिलासा मिळविला. मात्र सरकारने सादर केलेल्या शपथपत्रात खोटी माहिती देऊन सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याचे लक्षात येताच व विरोधी पक्षांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर सरकारने प्रिटींग मिस्टेक (टायपो एरर) झाल्याचे सांगितले. सरकारने दिलेल्या खोट्या माहितीच्या आधारेच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने या निकालात बदल करण्याची विनंती सरकारनेच सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. 

सरकारच्या या कृतीमुळे राफेल सौद्यात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. राफेल सौद्यात झालेल्या भ्रष्टाचाराची संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी असून सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याशिवाय कॉंग्रेस शांत बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देश का चौकीदार चोर है...अशी घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.  
 

संबंधित लेख