माध्यमांशी पंगा नडला; अकोल्याचे जिल्हाधिकारी पांडेय यांची अखेर उचलबांगडी

अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. पापळकर जिल्ह्याची धुरा सांभाळणार आहेत.
माध्यमांशी पंगा नडला; अकोल्याचे जिल्हाधिकारी पांडेय यांची अखेर उचलबांगडी

अकोला : अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. पापळकर जिल्ह्याची धुरा सांभाळणार आहेत.
 

पांडेय यांची बीडचे जिल्हाधिकारी म्हणून बदलीचे आदेश बुधवार (ता. २०) रोजी अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आल्याची माहिती आहे.
 
वर्तमानपत्रांचे संपादक व प्रतिनीधींना आपल्या बंगल्यावर बोलावून त्यांचा अपमान केल्याचे प्रकरण पांडेय यांना भोवल्याची खमंग चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

शासनाने बुधवारी राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांचाही समावेश असून, त्यांची बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्तपदावर चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. पापळकर यांना अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. पांडेय हे बीड येथे एम. देवेंदर सिंह यांच्या जागी नियुक्ती देण्यात आली आहे.

मोर्णा महोत्सवाच्या अपयशाचे खापर माध्यमांवर फोडून वर्तमानपत्रांचे संपादक व प्रतिनीधींना आपल्या बंगल्यावर बोलावून त्यांचा अपमान केल्याप्रकरणी शासनाने पांडेय यांची चौकशी विभागीय आयुक्तांकडून करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानूसार अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी अकोल्यात चौकशी करून तसा अहवाल राज्याचे मुख्य सचिव यांना सादर केला होता. त्या अहवालाच्या अनुषंगानेच  त्यांची मुदतीपूर्वी  बदली करण्यात आल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com