akola collector in new face | Sarkarnama

आणि जिल्हाधिकारी झाले बैलगाडीचालक...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

जिल्ह्यात महसूल दिनानिमित्त मंगळवार (ता.एक) पासून संगणकीकृत सातबारा वितरणास सुरूवात करण्यात आली. तालुक्‍यातील चांदूर येथे आयोजित सातबारा वितरण कार्यक्रमास जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय शेतकऱ्याच्या वेषात हजेरी लावली.

अकोला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संगणीकृत सातबारा वितरणाच्या कार्यक्रमासाठी चांदूर येथे गेलेल्या जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी बैलगाडी चालवित गावात प्रवेश केला. शेतकऱ्यांच्या वेशात असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना पाहून अनेक ग्रामस्थांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. 

जिल्ह्यात महसूल दिनानिमित्त मंगळवार (ता.एक) पासून संगणकीकृत सातबारा वितरणास सुरूवात करण्यात आली. तालुक्‍यातील चांदूर येथे आयोजित सातबारा वितरण कार्यक्रमास जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय शेतकऱ्याच्या वेषात हजेरी लावली. शेतकरी हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. 

सातबारा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे, त्यामुळे शासनाने सातबाराचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला. अकोला जिल्हयात हे काम पूर्ण झाले असून हा संगणकीकृत सातबारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी पाण्डेय हे सायकलने चांदुर गावात पोहोचले. त्यानंतर गावाच्या वेशीपासून त्यांनी बैलगाडी चालवत गावात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबाऱ्याचे वितरण करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केला. 
 

संबंधित लेख