akola bus stand | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

अकोल्याच्या लोकप्रतिनिधींकडून परिवहन अधिकाऱ्यांची झाडाझडती

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

बसस्थानक परिसरात पसरलेली अस्वच्छता, कर्मचाऱ्यांच्या विश्रामगृहात पसरलेली घाण आणि अतिक्रमणामुळे प्रवाशी व महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय. या गंभीर प्रश्नाकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने खासदार धोत्रे, आमदार सावरकर आणि महापौर विजय अग्रवाल यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला.

अकोला : अस्वच्छता, अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या एसटी बसस्थानकाच्या बेताल कारभारावर खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर आणि महापौर विजय अग्रवाल यांनी ताशेरे ओढत सोमवारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. स्थानिक अधिकाऱ्यांकडून थातूर-मातुर उत्तरे मिळत असल्याने खासदार धोत्रेंनी थेट महामंडळाच्या एमडींना फोन करून कारभार सुधारण्याचा अल्टीमेट्‌म दिला. 

अकोला बसस्थानकावरील अस्वच्छता, अतिक्रमणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवासी, नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जनतेच्या या प्रश्नावर आक्रमक होत खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती बाळ टाले, भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, नगरसेवक अजय शर्मा आदींनी बसस्थानक गाठत अधिकाऱ्यांचा "क्‍लास' घेतला. 

या बसस्थानकाच्या साफसफाईचे कंत्राट एका खासगी संस्थेला दिला असून हजारो रुपयांची देयके काढण्यात येतात. मात्र, बसस्थानक परिसरात पसरलेली अस्वच्छता, कर्मचाऱ्यांच्या विश्रामगृहात पसरलेली घाण आणि अतिक्रमणामुळे प्रवाशी व महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय. या गंभीर प्रश्नाकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने खासदार धोत्रे, आमदार सावरकर आणि महापौर विजय अग्रवाल यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने खासदार धोत्रे यांनी महामंडळाच्या एमडींना फोन करून अकोल्यातील महामंडळाच्या गलथान कारभाराबाबत अवगत करीत तातडीने कारभार सुधारण्याचा अल्टीमेट्‌म दिला. 
अतिक्रमण हटविले 
खासदार, आमदारांनी बसस्थानकाची झाडाझडती घेत अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वाहतुक शाखेचे पोलिस निरिक्षक विलास पाटील, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बसस्थानक परिसरातील अतिक्रमणधारकांवर कारवाई करीत अतिक्रमण हटविले. 
 

संबंधित लेख