akola bjp problem | Sarkarnama

भाजपमधल्या गटबाजीचा अकोल्यात पालकमंत्र्यांना फटका

श्रीकांत पाचकवडे
शनिवार, 1 जुलै 2017

अकोला : भाजपमधील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण थांबत नसून पालकमंत्री विरुद्ध खासदार गटातील कुरघोडी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातूनच दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एका व्यासपीठावर येण्याचे टाळले जात आहे. पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावर भाजपच्याच खासदार, आमदारांकडून अघोषीत बहिष्कार घातला जात असल्याचे दिसून येत आहे. अकोल्यात काल आयोजित केलेल्या रोजगार व कौशल्य विकास मेळाव्यात खासदार, आमदारांसह भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने हा मेळावा चर्चेचा विषय ठरला आहे. 

शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. जिल्ह्यात विकास कामांवरून भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे आणि गृहराज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यात सुरू झालेली श्रेयवादाची लढाई टोकाला गेली आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांचे उणे-दुणे काढण्यात कसलीही कमतरता ठेवली जात नाही. 

भाजपमधल्या नेत्यांमधील हा वाद सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहचल्याने कार्यकर्तेही गटा-तटाच्या राजकारणात गुरफटून पडले आहेत. अकोल्यात कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री असलेले डॉ. रणजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांच्यासह शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, महापौर विजय अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई वाघोडे आदींना निमंति करण्यात आले होते. मात्र, केवळ भारिप-बमसंच्या जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई वाघोडे यांच्याव्यक्तीरिक्त कुठल्याही लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमास हजेरी लावली नाही. विशेष म्हणजे भाजपचेच खासदार संजय धोत्रे, आमदार शर्मा, आमदार सावरकर, महापौर विजय अग्रवाल यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. 

दोन नगरसेवक उपस्थित 
महापालिकेत भाजपचे अठ्ठेचाळीस नगरसेवक आहेत. मात्र, या कार्यक्रमास भाजपचे नगरसेवक हरिष आलिमचंदाणी, नगरसेवक आशिष पवित्रकार यांच्यासह भाजपचे माजी महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, मोतीसिंग मोहता यांचीच व्यासपीठावर उपस्थिती दिसली. 

व्यासपीठावर आसन व्यवस्था अपुरी 
या मेळाव्यात निमंत्रित लोकप्रतिनिधी येणार नसल्याचा अनुभव लक्षात घेता व्यासपीठावर आसन व्यवस्थाही मोजकीच ठेवण्यात आल्याचे दिसून आले. सहा व्यक्ती बसतील असे दोन सोफे आणि त्यामागे सहा-सात खुर्च्या इतकीच आसन व्यवस्था होती. 

संबंधित लेख