akola bjp leader | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

अकोल्यातील भाजप नेत्याकडून विनयभंग 

सरकारनामा ब्युराे
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

अकोला : जिल्हा परिषद सदस्या निकिता रेड्डी यांचे पती तथा भाजपचे नेते प्रकाश रुद्रस्वामी रेड्डी यांच्याविरूद्ध विनयभंग प्रकरणी अकोट फैल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

एक महिला तिच्या अल्पवयीन भावासोबत दुचाकीने उगवा फाट्याजवळून जात होती. याच रस्त्याने प्रकाश रेड्डी कारमधून जात होते. त्यांची नजर महिलेवर पडली. म्हणून त्यांनी गाडी पलटून तिचा पाठलाग केला व गाडी तिच्या दुचाकीच्या समोर उभी केली. कारमधून उतरून तुझी गाडी येथेच राहू दे, माझ्या गाडीतून चाल असे म्हणून उजवा हात पकडून जबरदस्तीने कारजवळ नेले; महिलेने हाताला झटका दिला त्यात महिलेचा हातही कारच्या गेटमध्ये अडकला होता. महिलेने हात सोडवला व अकोट फैल पोलिस ठाणे गाठले. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकाश रेड्डी याच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार तिरुपती राणे करीत आहेत. 
 
संबंधित लेख