मामाच्या प्रचाराचा भार भाच्यावर

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आजारी पडलेल्या मामांना तिकिट तर मिळाले. मात्र, डॉक्टरांना धावपळ करण्यास मनाई केल्याने घरबसल्या प्रचाराची सूत्र हलविण्याची वेळ आली. अशा परिस्थिती आमदार भाचा धावून आला आणि प्रचाराचा सर्व भार स्वतःच्या खांद्यावर उचलून भर ऊन्हात जिल्हा पिंजून काढू लागला.
मामाच्या प्रचाराचा भार भाच्यावर

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आजारी पडलेल्या मामांना तिकिट तर मिळाले. मात्र, डॉक्टरांना धावपळ करण्यास मनाई केल्याने घरबसल्या प्रचाराची सूत्र हलविण्याची वेळ आली. अशा परिस्थिती आमदार भाचा धावून आला आणि प्रचाराचा सर्व भार स्वतःच्या खांद्यावर उचलून भर ऊन्हात जिल्हा पिंजून काढू लागला.

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपच्या तिकिट वाटपाबाबत सुरुवातीला गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. या गोंधळातच अमरावती येथे भाजप-शिवसेना युतीचा मनोमिलन सोहळा झाला. या सोहळ्याला अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचीही उपस्थिती होती. हा सोहळा आटोपून खासदार अकोल्यात परतल्यानंतर त्यांना छातीच्या दुखण्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना येथील ओझोन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना काही दिवस संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

दरम्यान, विद्यमान खासदारांनाच उमेदवारी कायम ठेवण्याच निर्णय भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतला. उमेदवारी मिळाली खरी मात्र प्रकृती अस्वास्थामुळे खासदारांना प्रचाराच्या धामधुमीपासून दूरच रहावे लागत आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मै चौकीदार’ या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रमालाही खासदार उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी घरी बसूनच हा कार्यक्रम बघितला. आता प्रचाराला १६ दिवस शिल्लक आहेत.अशा परिस्थितीत धावपळून खासदार प्रचार करू शकणार नाही, हे उघड आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचाच भाचा अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांच्या खांद्यावर येऊ पडली आहे. त्यांनीही तुर्तास ही जबाबदारी समर्थपणे सांभाळत कॉर्नर सभा घेत गावे पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.  

अन्य आमदार व पदाधिकारीही सक्रीय
अकोला लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा पैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यापैकी अकोला पूर्वची जबाबदारी व संपूर्ण प्रचाराची धुरा आमदार सावरकर सांभाळत असले तरी इतर मतदारसंघातील भाजपचे आमदारही खासदारांच्या प्रचारात व्यग्र आहेत.
                  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com