akola-bajoria-poster-in-ayodhya | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

आमदार पिता-पुत्र बाजोरियांची अयोध्येत पोस्टरबाजी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

`पहिले मंदिर फिर सरकार'चा नारा देत संपूर्ण देशाचे लक्ष वेधणाऱ्या शिवसेनेच्या अयोध्येतील महाआरती कार्यक्रमात आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि आमदार विप्लव बाजोरिया यांनी केलेली पोस्टरबाजी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

अकोला : `पहिले मंदिर फिर सरकार'चा नारा देत संपूर्ण देशाचे लक्ष वेधणाऱ्या शिवसेनेच्या अयोध्येतील महाआरती कार्यक्रमात आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि आमदार विप्लव बाजोरिया यांनी केलेली पोस्टरबाजी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. शरयू नदी परिसरासह संपूर्ण अयोध्या शहरात पिता-पुत्र बाजोरिया यांचे पोस्टर लागले असल्याने अयोध्येतही आमदार बाजोरिया यांनी डंका पिटला आहे. 

भाजप केवळ निवडणुकीपुरताच श्रीराम मंदिर निर्माणाचा मुद्दा पुढे करीत असल्याचा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. श्रीराम मंदिराच्या मुद्यावर भाजपला कोंडीत पकळण्यासाठी `पहिले मंदिर फिर सरकार' करण्याचा नारा देत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी अयोध्येत दाखल होत शरयू नदीवर महाआरती करणार आहेत. 

शिवसेनेच्या या मिशन अयोध्याने संपूर्ण देशाचे लक्ष आज अयोध्येकडे लागले असतानाच आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि आमदार विप्लव बाजोरिया यांनी अयोध्येत ठिक-ठिकाणी शिवसेनेचे पोस्टर झळकविल्याने हे पोस्टर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. शरयू नदी परिसरासह अयोध्येत लागलेल्या या पोस्टरचे फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहेत. आमदार बाजोरिया हे शुक्रवारीच अयोध्येत दाखल झाले असून तेथे अकोला, वाशिम, बुलडाणा, हिंगोली, परभणी जिल्ह्यातून येणाऱ्या शिवसैनिकांची निवास, भोजनाची व्यवस्था करीत आहेत.  

संबंधित लेख