आशिष देशमुख करणार अकोला लोकसभा मतदारसंघाची चाचपणी ? 

अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांपेक्षा जिल्ह्याबाहेर नेत्यांना अधिक पसंती मिळाली आहे. अकोला-वाशीम जिल्ह्यात ही परंपरा वसंतराव साठे, गुलामनबी आझाद यांनी जोपासली आहे. ही परंपरा आशिष देशमुख यांच्या रुपाने काँग्रेस पुढे चालविल का? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
आशिष देशमुख करणार अकोला लोकसभा मतदारसंघाची चाचपणी ? 

अकोला : कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादकांची (कासोधा) परिषद अकोल्यात येत्या २३ ऑक्टोबर रोजी होत आहे. या परिषदेच्या माध्यमातून काटोलचे माजी आमदार व भाजपमधून परत पुन्‍हा काँग्रेसवाशी झालेले आशिष देशमुख लोकसभा मतदारसंघाचा मार्ग शोधण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

भाजपमधून बाहेर पडल्यानंतर आशिष देशमुख सक्षम व्यासपीठाच्या शोधात आहे. त्यांचा हा शोध कासोधा परिषदेच्या व्यासपीठावर संपण्याची शक्यता आहे. अकोला होऊ घातलेल्या या कासोधा परिषदेचे निमित्त करून ते लोकसभा निवडणुकीसाठी अकोला मतदारसंघाचा पर्यायाची चाचपणी करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

देशमुख यांनी नुकताच आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. अशा परिस्थितीत ते अकोला लोकसभा मतदारसंघाचा पर्याय शोधू शकतात. काँग्रेसच्या वाटेला असलेल्या या जागेवर अद्याप कोणत्याही उमेदवाराने दावा न केल्याने रिक्त आहे. वाशीमचे ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव देशमुख यांचा एक पर्याय काँग्रेसपुढे खुला आहे. मात्र, एेनवेळी त्यांनी नकार दिला तर काँग्रेसकडे दुसरा सक्षम पर्यात स्थानिक पातळीवर उपलब्ध होणे अश्‍यक आहे. अशा परिस्थिती अकोला मतदारसंघात आशिष देशमुखच्या रूपाने पर्यायी उमेदवाराचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू आहे. यापूर्वी 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ऐनवेळी सहकार क्षेत्रातील अकोट येथील नेते हिदायत पटेल यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत झाली. 

भाजपतर्फे मराठा उमेदवार खासदार संजय धोत्रे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली होती. २०१९ मध्येही तेच भाजपचे उमेदवार राहणार हे निश्‍चित. त्यांना भारिप-बमसंचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान राहणार. आंबेडकर यांची काँग्रेससोबत आघाडी न झाल्यास काँग्रेसला अकोला लोकसभा मतदारसंघात नवीन उमेदवार शोधावा लागणार आहे. अशा परिस्थितीत स्थानिक नेत्यांपैकी कोणाचा विचार होणार यावर अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आले नाही. त्यातच स्थानिक नेत्यांपैकी कोणीही लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक नाही. याला अनंतराव देशमुख यांचा अपवाद असला तरी त्यांच्याकडूनही अद्याप निवडणूक लढविण्याबाबत काही हालचाली होताना दिसत नाही. ते स्वतःच्या मुलाला नकुल देशमुख यांना मुख्य राजकीय प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ऐनवेळी अकोला लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार निवडण्याचा विचार झाल्यास आशिष देशमुख यांचे नाव पुढे येऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com