akola andolan | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

भाजपच्या करवाढीविरोधात कॉंग्रेसचे जनआंदोलन

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

अकोला : महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केलेल्या करवाढीविरोधात जनचेतना आंदोलनाच्या माध्यमातून कॉंग्रेसने रणशिंग फुंकले आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून करवाढीचे समर्थन म्हणजे विकासाचा भुलभुलैया असून शहरातील मालमत्तांच्या मोजणीसाठी एका खासगी कंपनीला दिलेल्या आठ कोटी रुपयांच्या कंत्राटामागील गोलमाल कारभाराच्या चौकशीचे आदेश देऊन मुख्यमंत्र्यांनी आपला कारभार पारदर्शक असल्याचे अकोलेकरांना दाखवून द्यावे अशी मागणी कॉंग्रेसने लावून धरली आहे. 

अकोलेकरांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपने अवाजवी करवाढ करून अकोलेकरांवर आर्थिक बोजा लादला असल्याचा हल्लाबोल कॉंग्रेस, भारिप बमसं, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे. या करवाढीच्या विरोधात महापालिकेच्या सभागृहात आक्रमक भुमिका घेणारा कॉंग्रेस पक्ष आता रस्त्यावर उतरून करवाढीचा विरोध करण्यासाठी जनआंदोलन उभारत आहे. 

महापालिकेतील तत्कालीन उपायुक्त माधुरी मडावी यांनी महानगरातील 98 हजार मालमत्ताधारकांची घरोघरी जाऊन मोजणी केली. या मोजणीचे केवळ डाटा अपडेशनचे काम अपूर्ण असतांना सत्ताधारी भाजपने केवळ एकाच निविदेवर एक लाख पाच हजार मालमत्ता मोजणीसाठी सुमारे आठ कोटी रुपयांचे कंत्राट स्थापत्य कन्सलटन्ट (ई) प्रायव्हेट लिमिटेड अमरावती या कंपनीला दिला. मनपाच्या अधिकाऱ्यांनी मालमत्तांची मोजणी केली असताना त्याच मालमत्तांच्या मोजणीच्या कामासाठी आठ कोटीची निविदा देण्यामागे सत्ताधारी भाजपने केलेल्या गोलमाल कारभाराची चौकशी करण्याची मागणी कॉंग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण, प्रदीप वखारिया, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, प्रदेश महासचिव मदन भरगड, प्रदेश प्रवक्ता डॉ. सुधीर ढोणे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

भाजपचे पालकमंत्री, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक करवाढीच्या ठरावाचे समर्थन करून अकोल्याच्या विकासाचे गाजर दाखवित आहेत. मात्र, त्यांची आश्वासने म्हणजे विकासाचा भुलभुलैया असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कंत्राटाची सखोल चौकशी करून अकोलेकरांना आपला कारभार पारदर्शक दाखवावा अशी मागणी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. 
 
संबंधित लेख