akjad party in vadgon sheri | Sarkarnama

वडगाव शेरीत आखाड पार्ट्यांतून विधानसभेची मोर्चेबांधणी

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पुणे : राजकीय कार्यकर्त्यांसाठी आषाढ महिना व्यस्त असतो. त्यात आता विधानसभा निवडणूक वर्षभरावर आल्याने त्यासाठी इच्छुक असलेल्यांनी आपला उमेदवारीचा संकल्प या महिन्यांतील आखाड पार्ट्यांतून दाखवून देण्याची परंपरा आहे. त्याचाच प्रत्यय वडगाव शेरीत आला.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नगरसेवक सुनील टिंगरे यांनी जंगी आखाड पार्टी आयोजित करून आपण २०१९ ची निवडणूक लढविणार असल्याचे अघोषितरित्या सांगितले. त्यांनी संपूर्ण मतदारसंघासाठीच निमंत्रण दिले असल्याने मोठी गर्दी झाली. त्यांचे पक्षांतर्गत विरोधकही पार्टीला उपस्थित राहिल्याने  त्याची चर्चा त्यानंतरही जिभेवर रेंगाळत राहिली.

माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली. याच पठारे यांनी २०१२ च्या पुणे महापालिका निवडणुकीत टिंगरे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळू नये म्हणून फिल्डिंग लावली होती. त्याचा वचपा टिंगरे यांनी २१०४ च्या विधानसभा निवडणुकीत काढला होता. टिंगरे यांनी शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढविली. त्यात ते पाच हजाराच्या फरकाने पराभूत झाले. पठारे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. या दोघांच्या भांडणात भाजपचे जगदिश मुळीक यांनी बाजी मारत विधानसभा गाठली. 

आखाडाच्या निमित्ताने पठारे आणि टिंगरे हे दोघेही परत एकत्र आल्याची चर्चा सुरू झाली. अर्थात या संबंधांचे  खरे चित्र २०१९ च्या आधीच स्पष्ट होईल. वडगाव शेरी मतदारसंघातील बरेच नेते खवैय्ये असल्याने अशा भोजनाचे कार्यक्रम म्हणजे राजकीय शक्तिप्रदर्शन ठरते. आता आखाड महिन्याचे काहीच दिवस राहिले असल्याने इतर नेत्यांनीही आता या शक्तिप्रदर्शनासाठी तयारी चालविली आहे.  

संबंधित लेख