राज्यसभा उपसभापतीपदावरून अकाली दल भाजपवर नाराज

राज्यसभा उपसभापतीपदावरून अकाली दल भाजपवर नाराज

नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदाची निवड आता दोन दिवसावर म्हणजे गुरूवारी होणार आहे. या पदासाठी आधी अकाली दलाचे खासदार नरेश गुजराल यांचे नाव चर्चेत होते, मात्र भारतीय जनता पक्षाने ऐनवेळी संयुक्त जनता दलाचे खासदार हरिवंश यांचे नवा पुढे केल्याने अकाली दल आता भाजपवर अत्यंत नाराज झाला आहे. याआधी भाजपवर शिवसेना आणि तेलूगु देसम हे पक्ष नाराज झाले आहेतच. त्यातील तेलुगू देसमने त भाजप आघाडी सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि सरकारवर अविश्‍वास ठरावही दाखल केला होता. 

याच ठरावावेळी शिवसेनेने अनुपस्थित राहून आपली नाराजी दर्शवली होती व सरकारला नेमका इशारा दिला होता. राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी खरेतर आधी शिवसेनेचे नाव पुढे आले होते. मात्र नंतर ते नाव मागे पडले आता पुन्हा एकदा या पदाने अकाली दलाला हुलकावणी दिली आहे. त्यामुळे हा पक्ष भाजपवर नाराज झाला आहे. या पक्षाच्या नेत्या व केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आपली तीव्र नाराजी भाजपजवळ व्यक्त केली आहे. दरम्यान आज दुपारी सर्व विरोधी पक्षाची 1 वाजता बैठक होत असून त्यांचा उमेदवार निश्‍चित होईल आणि मग या लढाईला खरा रंग येईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com