ajitdada solapur tour | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

अजितदादा सोलापूरला कधी येणार ? 

प्रमोद बोडके 
शुक्रवार, 7 जुलै 2017

सत्ता गेली की क्रेझ संपते. क्रेझ हरवलेला पक्ष म्हणून सोलापूर जिल्ह्यात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसची ओळख झाली आहे. राज्याच्या नेत्यांना जिल्ह्यात काय चाललयं याचं देणघेण नाही आणि जिल्ह्यातील नेत्यांना पक्षाच काही देणं घेणं नाही. अशीच स्थिती सोलापूर शहर आणि ग्रामीण राष्ट्रवादीत आहे.

सोलापूर : सत्ता गेली की क्रेझ संपते. क्रेझ हरवलेला पक्ष म्हणून सोलापूर जिल्ह्यात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसची ओळख झाली आहे. राज्याच्या नेत्यांना जिल्ह्यात काय चाललयं याचं देणघेण नाही आणि जिल्ह्यातील नेत्यांना पक्षाच काही देणं घेणं नाही. अशीच स्थिती सोलापूर शहर आणि ग्रामीण राष्ट्रवादीत आहे. 

केंद्रातील आणि राज्यातील सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीकडे काही काळ महापालिका आणि जिल्हा परिषदेची सत्ता होती. या सत्तेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांच्या किमान भेटीगाठी तरी होत होत्या. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने सपाटून मार खाल्ला आणि झेडपीत संधी असतानाही राष्ट्रवादी गाफील राहिली. या सर्वांचा परिणाम सध्याच्या घडीला राष्ट्रवादी कुठेच सत्तेत दिसत नाही. सत्तेत नसलेली राष्ट्रवादी विरोधी पक्ष म्हणून प्रभावी काम करून जनाधार मिळविण्याचा प्रयत्न करतानाही दिसत नाही. जिल्हा राष्ट्रवादीतील आजी-माजी आमदार आणि खासदार, दुसऱ्या फळीतील नेते यांचा संवाद हरपलेला दिसत आहे. राष्ट्रवादीचा प्रत्येक नेता आपल्या तालुक्‍यापुरताच विचार करू लागला आहे. 

राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरची जबाबदारी स्वीकारली खरी परंतु निवडणुका होण्याच्या अगोदरपासून गायब झालेले अजित पवार अद्यापही सोलापूरला आलेले नाहीत. नेत्यांनीच जिल्ह्याकडे पाठ फिरवल्यावर कार्यकर्ते तरी कसा उत्साह दाखविणार? अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा संयुक्त दौरा सुरू केला आहे. 29 जून ते 18 जुलैपर्यंत हा दौरा होणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातून सोलापूरला कट मारून हा दौरा होत आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्याकडे या दोन्ही नेत्यांनी का पाठ फिरवली? याबद्दल उलट सुलट चर्चांना वेग आला आहे. 

सोलापूर शहर राष्ट्रवादी असो की जिल्हा राष्ट्रवादी. राष्ट्रवादीच्या युवक, महिला, विद्यार्थी, युवती या शाखांमधील पदाधिकारी बदलाची आता वेळ आली आहे. वर्षानुवर्षे तेच ते चेहरे पदांवर दिसू लागल्याने राष्ट्रवादीत उत्साहाचा अभाव दिसत आहे. सोलापूर महापालिकेत दहा वर्षांहून अधिक काळ सत्तेत राहणाऱ्या शहर राष्ट्रवादीला तर महिला, युवक आणि विद्यार्थी आघाडीला अध्यक्ष मिळू नये या पेक्षा अधिक शोकांतिका काय असावी? 

संबंधित लेख