ajitdada satara tour | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

दादा आले अन्‌ फक्‍त सल्ला देऊन गेले ! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 जुलै 2017

अजितदादांच्या दौऱ्यानंतर पक्ष, संघटनेत काय बदल केले जाणार यासंदर्भात पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना विचारले असता, ते म्हणाले, दोन चार दिवसात आम्ही सर्व आमदारांसोबत बैठक घेऊन पक्ष, संघटना व विविध सेलच्या निवडी आणि त्यांच्याकडून कोणती कामे होण्याची अपेक्षा आहे, याविषयी चर्चा करून निर्णय घेणार आहोत. 

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संघटना बांधणी आणि कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा जिल्हा दौरा नुकताच झाला. पण या दौऱ्यात दादा आले आणि युवक, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना सल्ला देऊन गेले. पण पक्षांतर्गत गटबाजी आणि कुरबूरीवर इलाज काढायचे राहून गेले. त्यामुळे पक्षातील जुन्या जानता कार्यकर्त्यांना हा दौरा म्हणजे दादा आले अन्‌ गेले...असाच वाटू लागला आहे. 

राष्ट्रवादीच्या संघटना बांधणीसाठी अजित पवार आणि सुनील तटकरे यांचे राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात दौरे सुरू आहेत. सातारा जिल्ह्याचा आढावाही दोन दिवसांपूर्वी झाला. आढाव्यात अजित पवारांनी युवक व महिला आघाडीतील आजी माजी पदाधिकाऱ्यांचे कान धरून सबूरीने घेण्याचा सल्ला दिला. तर महिला आघाडीला घरातील भांडणे घरातच सोडविण्याची सूचना केली. पण पक्षांतर्गत कुरबूरी आणि गटतटामुळे संघटनेत आलेला विस्कळीतपणावर इलाज करण्याचे दादांचे राहून गेले. पक्षातील बहुतांशी जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना दादांचा दौरा म्हणजे दादा आले अन्‌ गेले..असाच वाटू लागला आहे. 

मुळात दादांनी दिवसभर थांबून पक्षातील प्रत्येक विभागाचा स्वतंत्र आढावा घेऊन त्यांच्यातील हेवेदावे, पदाधिकाऱ्यांकडे पक्ष संघटनेकडे असलेले दूर्लक्ष यावर काहीतरी उपाय होणे गरजेचे होते. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. महिला आघाडीत तीन पदाधिकाऱ्यांची तीन दिशेला तोंडे व त्यातून प्रत्येकाने आपापल्या जवळच्या महिला कार्यकर्तीला पदे देण्याचा सपाटा लावला आहे. महिला आघाडीत कार्यकर्त्या कमी आणि पदाधिकारीच जास्त झाले आहेत. यावर कुठेतरी अंकुश ठेवण्यासाठी दादांकडून सूचना होणे अपेक्षित होते. 

जिल्हा कार्यकारिणीची बैठकीत जिल्हाध्यक्षांसह उपाध्यक्ष, सरचिटणीस काय काम करतात, पक्ष संघटनावाढीसह इतर आंदोलनात ही मंडळी किती हिररीने सहभागी होतात, याची चाचपणी दादांनी करायला हवी होती. प्रत्यक्षात तसेच झाले नाही. पण त्यांनी जाता जाता काही चमकुगिरी करणाऱ्यांना चिमटे काढले. आता अडीच महिन्यानंतर दादा पुन्हा संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी येणार आहेत. तोपर्यंत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जैसे थे च राहतील, यात शंका नाही. 

 

संबंधित लेख