मावळमध्ये नवखा उमेदवार, सांभाळून घ्या : अजितदादांचे आवाहन

मावळमध्ये नवखा उमेदवार, सांभाळून घ्या : अजितदादांचे आवाहन

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा नवखा उमेदवार उभा राहिला तर सांभाळून घ्या, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला मुलगा पार्थ पवार याच्यासाठी मोर्चेबांधणी केली. 

पनवेलमध्ये शेकापच्या मेळाव्यात ते बोलत होते. त्यांनी थेट पार्थ यांचे नाव घेतले नाही. पण योग्य तो संदेश उपस्थितांना देऊन त्याच्या प्रचाराची अनधिकृतरित्या सुरवात केली.

``निवडणुकीच्या काळात अनेक जण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. पण दुसऱ्या पक्षात जाणार हा मास लीडर असेल तर फरक पडतो. सुजय विखे पाटील जाण्याने काही परिणाम होत नाही जे आपल्या आई - वडिलांचे  ऐकत नाही  तो जनतेच काय ऐकणार,`` असा टोला अजित पवार यांनी 

पार्थ यांचे पनवेल, उरण भागात दौरे सुरू आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी थेट उत्तर दिले नाही. पण शितावरून भाताची परीक्षा करू नका, असेही सांगितले. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागावाटपात 48 पैकी तरुण आणि ज्येष्ठांनाही उमेदवार देण्यात येणार आहे.

शरद पवार यांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी विनंती त्यांचे नातू रोहित पवार यांनी केली होती. त्यावर विचारले असता घरात शरद पवार यांचा शब्द अंतिम असल्याचे अजितदादांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com