अजितदादांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोबंल्याने ते गप्प : उद्धव ठाकरे 

अजितदादांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोबंल्याने ते गप्प : उद्धव ठाकरे 

जळगाव : शिवसेना दुतोंडी गांडूळ असल्याचे अजित पवार म्हणतात, "" गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे. परंतु पवारांना किती तोंडे आहेत. उपमुख्यमंत्री असतांना ज्या तोंडाने त्यांनी शेतकऱ्यांबाबत अहवेलना करणारे शब्द उच्चारले ते तोंड आज शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर गप्प आहे. कारण त्यांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोंबला आहे. असा टोला शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लगावला आहे. 


धरणगाव(जि.जळगाव) येथील जाहीर सभेत ते बोलत होते. "" शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केल्याशिवाय सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. आम्ही सत्त्तेत असून शेतकऱ्यासाठी आवाज उठवित असल्यामुळे अजित पवार यांनी आमची अहवेलना केली आहे. त्यांनी शिवसेना दुतोंडी गांडूळ असल्याचे म्हटले आहे, मात्र त्यांना किती तोंडे आहेत हे त्यांनीच पहावे. सत्ताधाऱ्याविरूध्द त्यांनी आवाज उठवायाला पाहिजे. मात्र त्यांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोंबलेला असल्यामुळे ते गप्प आहेत. 

विखे पाटलांचे भाजपशी साटेलोटे 
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, "" विरोधी पक्ष नेता असतांनाही ते सरकार आपल्याला घरच्या सारखे वाटते म्हणतात. सरकाराला आपले म्हणणारे हे कसले आलेय विरोधी पक्षनेते. भाजप सरकारशी त्यांचे साटेलोटे आहे. शिवसेना मात्र अशा पद्धतीचे राजकारण चालू देणार नाही. 

बॅंकाना दाखविणार शिवसेना स्टाईल 
राज्य सरकारने कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. मात्र अद्यापही त्यांची अमलबंजावणी झालेली नाही. शासन कर्जमुक्तीसाठी जून 2016 पर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ देत आहे. त्यांनी वाढून 2017 करावी अशी आमची मागणी असून शिवसेना त्यांच्या ठाम आहे. कोणत्याही परस्थिती कर्जमुक्ती झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे ईशाराही त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक बॅंकेने कर्ज दिले पाहिजे ज्या बॅंका शेतकऱ्यांना नडतील त्यांना शिवसेना स्टाईल दाखविण्यात येईल. शिवसैनिकांनी आता बॅंकेसमोर टेबल खुर्ची टाकून बसावे असा आदेशही त्यांनी दिला आहे. यावेळी,पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते,सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार निलम गोऱ्हे, चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, उपस्थितत होते. 

या अगोदर पाळधी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते म्हणाले, शिवसेना कर्जमुक्ती झाल्यांशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. पाळधी गुलाबराव पाटलासारखा चांगला शिवसैनिक दिल्याबद्दल त्यानीं आभारही व्यक्त केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com